Chandannagar Jayanti Utsav Samiti is spearheaded by women
चंदननगर जयंती उत्सव समितीची धुरा महिलांच्या हाती
Dhule धुळे : चंदननगर मित्र मंडळाच्यावतीने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सद्यकालीन सामाजिक राजकीय स्थितीवर भाष्य करणारे प्रबोधनात्मक देखाव्यांचे सादरीकरण हे चंदननगर मित्र मंडळाचे वैशिष्टय राहिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंती साजरी करण्यासाठी छ. शिवाजी महाराज सभागृहात मंडळाचे अध्यक्ष किशोर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत जयंती उत्सव अभिनव पद्धतीने साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात येवून कार्यकारिणी गठित करण्यात आली.
समितीच्या अध्यक्षपदी सुजाता वाघ, उपाध्यक्षपदी पद्मा मोरे तर खजिनदार म्हणून रंजना रणशुर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच समितीचे सदस्य म्हणून धम्माचारिणी अचलाज्योती, कमल जाधव, बेबीताई अहिरे, चंद्रभागा वाघ, शारदा पाटील, ललीताबाई चव्हाण, विजया नगराळे, राज्योती जगदेव, रेखा शिंदे, संगीता वाघ, विद्या वाघ, भाग्यश्री सोनवणे, अनिता ढीवरे, वनिता ढीवरे, लता साबरे, सीता सौदागर, कमल वाघ, सारिका मोरे, गोजाबाई नेरकर, दीप्ती साळवे, माजी नगरसेविका ऍड. कामिनी पिंपळे यांची निवड करण्यात आली.
चंदननगरची वैशिष्टयपूर्ण परंपरा म्हणजे आकर्षक आणि प्रबोधनात्मक देखाव्याचे सादरीकरण करणे. बैठकीत देखाव्याबाबत चर्चा करण्यात येवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक परंपरा आणि सद्यःस्थिती यासंदर्भात देखावा सादर करणेबाबत निर्णय घेण्यात आला.
बैठकीस मंडळाचे उपाध्यक्ष चेतन अहिरे, खजिनदार हर्षल महाले, राजेंद्र जाधव, शिवदास शिंदे , महेश आहिरे, आनंद ठोसर, दीपक चौधरी, भैय्या नगराळे, आकाश आहीरे, सुमेध सुर्यवंशी, मनोज नगराळे, सागर साळवे, संदीप पवार, गणेश आव्हारे, सचिन वाघ, आकाश घोडे, भैय्या महाले, सचिन ठोसर, राजरत्न भामरे, अजय अहिरे, अविनाश वाघ, रोहित झाल्टे, सुमित साबरे, विकी कदम, अजय रघुवंशी आणि माजी नगरसेवक सिद्धार्थ जगदेव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व भूमिका सिद्धांत बागुल यांनी मांडली.