Dr. If you oppose printing and putting up the banner of Babasaheb Ambedkar Jayanti, we will file a case!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे बॅनर छापण्यास, लावण्यास विरोध केला तर गुन्हे दाखल करू! आंबेडकरी मोर्चासमोर प्रशासन नमले
Dhule धुळे: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे बॅनर लावण्यास प्रशासनाने विरोध केला असून, संतप्त झालेल्या आंबेडकरी समाजाने शुक्रवारी धुळे शहरातून भव्य मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांपुढे प्रशासन नमले आहे. बॅनर लावण्यास परवानगी दिली आहे.
मोर्चेकऱ्यांनी पोलीस अधीक्षक तसेच महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे बॅनर ७ एप्रिलनंतर छापून द्यावेत. तत्पूर्वी छपाई केल्यास बॅनर व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा, प्रिंटिंग प्रेस सील करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात हा मोर्चा निघाला. एक एप्रिलपासून शहरात बॅनर लावले जातील. बॅनर छापण्यास आणि लावण्यास विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील. तसेच भव्य मोर्चा काढला जाईल. परिणामांना प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला. दरम्यान, आमदार डॉ. फारूक शाह यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन बॅनर लावण्यास परवानगी द्यावी अशा सूचना दिल्या. आंबेडकरी समाजाचा विजय झाला असून, पोलीस अधीक्षकांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत बॅनर लावण्यास परवानगी देत असल्याचे स्पष्ट केले. पण प्रशासनाच्या अटी कायम आहेत. त्या अटी पोलीस अधीक्षकांनी सांगितल्या…
पोलीस अधिक्षकांना निवेदन देताना आमदार फारुक शाह, ज्येष्ठ नेते एम. जी. धिवरे, रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष वाल्मिक दामोदर, उपमहापौर नागसेन बोरसे, किरण जोंधळे, प्रा.अनिल दामोदर, भैय्यासाहेब पारेराव, रिपाइंचे शशी वाघ, आनंद लोंढे, किरण गायकवाड, शंकर खरात, विशाल पगारे, माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ, विनोद गरुड, किरण ईशी, योगेश ईशी, नगसेविका योगिता बागुल, गौतम पगारे, सरोज कदम, आनंद सैंदाणे, संजय चव्हाण, किर्ती गांगुर्डे, नगरसेवक दगडू बागुल आदी उपस्थित होते.