Theft of minor mineral in Nardana MIDC
नरडाणा एमआयडीसीत गौण खनिजाची चोरी, कारवाई करण्याची बाभळे ग्रामस्थांची मागणी
Dhule धुळे: नरडाणा एमआयडीसीत प्लाॅट क्रमांक ई १०७ मध्ये भराव करण्यासाठी गौण खनिजाची चोरी केल्याचा आरोप बाभळे ता. शिंदखेडा ग्रामस्थांनी केला आहे.
ललित रमेश कदम रा. कलमाडी याने त्याच्या जेसीबीच्या सहायाने भराव केला आहे. त्यासाठी लागणारी माती आणि मुरुम राॅयल्टी न भरता चोरून आणली आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडाला. याबाबत बाभळे ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाकडे तक्रार केली आहे. सदर कंपनीच्या जागेवर भराव केल्याचा पंचनामा करावा, कंपनीवर तसेच गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारीत केली आहे.
तक्रारीवर नितीन लोटन पाटील, प्रभाकर पांडुरंग पाटील, राकेश साहेबराव पाटील, गोविंद पुना रुपनर, अजय देविदास पाटील, प्रकाश लोटन पाटील, भालचंद्र बन्सीलाल पाटील, देविदास पोपट पाटील, अनिल रमन पवार यांच्या सह्या आहेत.