Set up Maharana Pratap Singh Economic Development Corporation for Rajput Society!
राजपूत समाजासाठी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करा!
Dhule धुळे : राजपूत समाजाच्या उन्नतीसाठी विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा करावी, अशी मागणी राजपूत समाजाने केली आहे.
विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी स्मारक समितीच्या नेतृत्वाखाली राजपूत समाजाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत ही मागणी केली. जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजपूत समाजात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठी आहे. राज्यात २० टक्के लोकसंख्या असलेल्या या समाजात तरुणांना रोजगाराचा प्रश्न भेडसावत आहे. या होतकरू तरुणांना अर्थसहाय्य मिळाले तर ते स्वतःच्या पायावर उभे राहून कुटूंबाचा उदरनिर्वाह करू शकतील. त्यासाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी गेली अनेक वर्षे कायम आहे. आमदार जयकुमार रावल यांनीही ही मागणी विधीमंडळात लावून धरली आहे.
निवेदन देताना स्मारक समितीचे अध्यक्ष अजितसिंह राजपूत, उपाध्यक्ष जगदिश राणा, सचिव मनजितसिंह सिसोदिया, तेजपाल गिरासे, प्रा. विजयसिंह सिसोदिया, नरेंद्रसिंह जमादार, गणेश कौर, नानासाहेब सूर्यवंशी आदी उपस्थित होते.