Declare a public holiday on the birth anniversary of Father of the Nation Mahatma Jyotiba Phule!
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी सार्वजनिक सुटी जाहीर करा!
Dhule News धुळे: सत्यशोधक तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी सार्वजनिक सुटी जाहीर करावी, अशी मागणी सत्यशोधक समाज संघाने केली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. सत्यशोधक समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या मागणीसाठी निदर्शने केली.
यावेळी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक आर. डी. तायडे, दिलीप देवरे, दीपक नगराळे, विलासराव माळी, ज्ञानेश्वर माळी, भैय्या जाधव, आप्पासाहेब वाडीले, विठोबा माळी, सुरेश झाल्टे, डॉ. सुनील वाघ, प्राचार्य बी. एच. जाधव, महेश सोनवणे, वकील सुनील सोनवणे, देवेंद्र पाटील, सुमित चौधरी, शरद देवरे आदी उपस्थित होते.