Ex-servicemen protest in Delhi for ‘One Rank One Pension’ Ex-servicemen are on the streets across the state
‘वन रॅंक, वन पेन्शन’साठी दिल्लीत आंदोलन, राज्यभर माजी सैनिक रस्त्यावर
Maharashtra News धुळे : ‘वन रँक वन पेन्शन’ या मागणीसाठी देशातील माजी सैनिकांचे दिल्ली येथील जंतर-मंतरवर मैदानावर आंदोलन सुरू आहे. याला पाठिंबा दर्शवण्यासाठी सोमवारी राज्यभर माजी सैनिक आणि विरपत्नींनी आपल्या कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी निदर्शने करून घोषणा देण्यात आल्या. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावरही मोर्चा धडकला. मोर्चेकऱ्यांच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले. मोर्चात माजी सैनिक व माजी सैनिकांचे कुटुंब मोठ्या संख्येने सहभागी झाले.