Villagers say malpractices in the scheme, madam engineer says intra-village disputes
ग्रामस्थ म्हणतात योजनेत गैरव्यवहार, अभियंता मॅडम म्हणाल्या गावांतर्गत वाद
zp news धुळे : तालुक्यातील गरताड गावात जलजीवन मिशन योजनेंतर्गत झालेल्या पाणीपुरवठा योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दहा-दहा दिवस पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच पाणीपुरवठा योजनेचे काम नव्याने करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी धुळे शहरात क्युमाईन क्लबजवळ बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. योगेश भामरे, नरेंद्र पाटील, हेमंत पाटील हे तरूण उपोषणाला बसले आहेत.
दरम्यान, गरताड पाणीपुरवठा योजनेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. तक्रारीनंतर तीनवेळा चौकशी झाली आहे. परंतु तक्रारदारांना चौकशी अहवाल मान्य नाही. शिवाय गावांतर्गत वाद असल्याने तक्रारदारांनी उपोषण सुरू केले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता जयश्री सार्वे यांनी दिली.