Facilitation of development of MLA funds for marginalized communities in Dhule city
धुळे शहरातील दुर्लक्षित वस्त्यांना आमदार निधीच्या विकासाची सुविधा
Dhule News धुळे : शहरातील दुर्लक्षित वस्त्यांचा आमदार निधीच्या माध्यमातून विकास होत आहे. येथील रहिवाशांना मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत.
अल्पसंख्याक भागात रस्ते, गटारी, पाण्याची पाईपलाईन यांसारख्या मुलभूत सोयी सुविधांकडे आजपर्यंत लोक प्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागाचा विकास थांबलेला होता. कॉलनी व वस्त्यांमध्ये रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरीकांचे हाल होत होते. त्या सगळ्या गोष्टींचा आमदार फारुख शाह यांनी अभ्यास करून ज्या भागात रस्ते, गटारी,पाईपलाईन नाही अशा वस्त्यांमध्ये निधी उपलब्ध करून कामाचा सपाटा लावलेला आहे. प्रभाग क्रमांक १९ जामचा मळा भागात रियाजभाई यांच्या घरापासुन ते नईमभाई यांच्या घरापर्यंत रस्ता खराब होता. या भागातील नागरिकांनी यासंदर्भात आमदार फारुख शाह यांना निवेदन देवून मागणी केली होती. याची तात्काळ दखल घेत आमदार फारुख शाह यांनी आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी १५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या कामाचा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच आमदारांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला नगरसेवक आमिर पठाण, प्यारेलाल पिंजारी, इकबाल शाह, आसिफ पोपट शाह, अजहर सैय्यद, माजीद पठाण, शादाब खाटीक, कौसर शाह, हमीद पिंजारी, जहुर शाह, रीयाजूद्दीन शेख, साजिद खान, पप्पू लोहार, सलीम खाटीक, जमीर शेख, निसार पिंजारी, नईम शेख, गुलाब मणियार, रफीक मन्सुरी उपस्थित होते.