If you save water today, you will live tomorrow!
आज पाणी वाचवाल तर उद्या जगाल!
Dhuel News धुळे : केंद्रिय जलशक्ती मंत्रालय अंतर्गत हाती घेतलेल्या जल संवर्धन कार्यक्रमाची सुरुवात सारा फाऊंडेशनच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यात सुरू झाली. सुरवातीला पाच गावांमध्ये जनजागृती करण्याचे कार्य सुरू होते. राष्ट्रीय जलशक्ती मिशन हाती घेऊन सारा फाऊंडेशन व नेहरू युवा केंद्र संगठण यांच्या संयुक्त विद्यमाने जलशक्ती मिशन व जल संवर्धनपर जनजागृती गावा-गावात सुरू आहे.
सदर कार्यक्रमात सारा फाऊंडेशनकडून गावांतील विहिरीजवळ तसेच तलावाजवळ पाणी संवर्धनाची शपथ नागरिकांना व विद्यार्थ्यांना दिली जात आहे. गावात मिरवणूक काढून जनजागृती करण्यात आली. पाण्याचे महत्व, होणारी नासाडी याबद्दल लोकांना समजूत घालण्यात येत आहे. गावा-गावात पाणी संवर्धनाचे फलक जागो-जागी संस्थेकडून लावले जाताय. पाणी संवर्धनाबाबतीत अनेक घोषवाक्ये व चित्रे गावातील भिंतींवर काढुन जनजागृती केली जात आहे. धुळे तालुक्यातील लळिंग, दिवाणमळा, जुन्नेर तर साक्री तालुक्यातील उंभरे व इंदिरानगर अशा पाच गावांमध्ये हे उपक्रम सुरू आहेत, असे अध्यक्ष संकेत वाकळे यांनी सांगितले.
यावेळी धुळे शहराध्यक्ष दीपक पाटील, धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष चिन्मय देवरे, तालुकाध्यक्ष आशुतोष लंगोटे, प्रशांत पाटील, दुर्गेश शिंदे, भावेश पाटील, हर्षल अहिरे, गौरव सोनवणे, धनराज वाकळे, किशोर वाकळे, चंद्रगुप्त पाटील, तुषार भदाणे, निखिल पाटील आदी उपस्थित होते.