Vighnaharta Hospital to take care of journalists’ health
पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरसावले विघ्नहर्ता हाॅस्पिटल
Dhule News धुळे : सतत बातमीच्या मागे धावणाऱ्या पत्रकारांची दिनचर्या धकाधकीची असते. धावपळीच्या जीवनामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि समस्या निर्माण होतात. पण आता चिंता नाही, कारण पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी धुळे शहरातील प्रसिद्ध सुपरस्पेशालिटी विघ्नहर्ता हाॅस्पिटल सरसावले आहे.
प्रसिद्ध ह्रदयविकार तज्ज्ञ डॉ. यतीन वाघ यांच्या पुढाकाराने रविवारी पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. शहरासह ग्रामीण भागातील पत्रकारांनी शीबिराचा लाभ घेतला.
या आरोग्य शिबिरात सीबीसी, रक्तातील साखरेच्या पातळी, युरिया, क्रिएटिन, युरिन रुटीन, लिक्विड प्रोफाईल, ब्लड ग्रुप, पीएफटी, ईसीजी, ब्लड प्रेशर, एक्स रे, ई. सी. जी. आदी चाचण्या करण्यात आल्या. तत्पूर्वी विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या वतीने डॉ. यतीन वाघ यांनी पत्रकारांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. पुनीत पाटील, डॉ. योगेश पाटील उपस्थित होते. पत्रकार प्रशांत परदेशी, पंकज पाटील यांनी डॉक्टरांचे आभार मानले.