What did MP Subhash Bhamre say about Akkalpada and Market Committee?
अक्कलपाडा अन् मार्केट कमिटीच्या कारभाराबद्दल काय म्हणाले खासदार सुभाष भामरे?
Dhule धुळे : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा प्रचार टोकाला पोहोचला असून, बुधवारी धुळे शहरात राम पॅलेस येथे भारतीय जनता पक्षाच्या मतदारांचा स्नेह मेळावा झाला. या मेळाव्याला बाजार समितीचे मतदार कमी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची संख्या अधिक असल्याची चर्चा मेळाव्याच्या ठिकाणी होती.
या मेळाव्याला माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, खासदार डॉ. सुभाष भामरे, गजानन पाटील, सुभाष देवरे, बोरकुंडचे बाळासाहेब भदाणे, संजय शर्मा, राम भदाणे यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. अक्कलपाडा प्रकल्प आणि मार्केट कमिटीच्या कारभाराबद्दल खासदार सुभाष भामरे यांनी नाव न घेता माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर टिका केली.
वर्षानुवर्षे रखडलेला अक्कलपाडा प्रकल्प भाजपने पूर्ण केला. अक्कलपाडा लहान प्रकल्प आहे. त्यापेक्षा अधिक मोठा सुलवाडे जामफळ प्रकल्प अवघ्या तीन वर्षात पूर्ण होणार आहे, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. तुम्हाला ३५ वर्षांच्या भोंगळ कारभाराऐवजी सुविधा आणि विकास हवा असेल तर मार्केट कमिटी भाजपच्या ताब्यात द्या, असे आवाहन खासदार भामरे यांनी शेतकरी मतदारांना केले.