Govansh was in the vehicle that hit Minister Dada Bhuse’s car
मंत्री दादा भुसेंच्या गाडीला कट मारणाऱ्या वाहनात होते गोवंश
Nashik नाशिक: जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या वाहनाला कट मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या पिक अप वाहनातून गोवंशाची अवैध वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे.
पालकमंत्री दादा भुसे हे महामार्गावरून मालेगावकडे जात होते. यावेळी एका भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांना कट मारला. यानंतर पळण्याचा प्रयत्न केला. परंतु कट मारून पळणाऱ्या वाहन चालकाचा हा पळण्याचा प्रयत्न फसला. कट मारल्यानंतर दादा भुसे यांच्या चालकाच्या समयसूचकतेमुळे गाडीवर नियंत्रण कायम राहिले. मात्र दादा भुसे यांनी संबंधित वाहनाचा पाठलाग करण्यास सांगितले. यानंतर पळून जाणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाइल पाठलाग सुरू झाला. आणि काही अंतरावर सदर पिकअप चालकाला पकडण्यात आले. हे वाहन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी वाहन चालकाची कानउघडणी करत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी वाहन चालकाची चौकशी केली आणि वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनातून अवैधरीत्या गोवंश वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे भुसे यांनी स्थानिक पोलीस अधिकारी आणि वाहतूक पोलिसांना पाचारण करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंत्री भुसे हे मालेगाव दौऱ्यावर आल्यानंतर ग्रामीण भागात भेटीसाठी जात असताना हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे.
व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर हा चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकाराने पुन्हा एकदा बेकायदा गोवंश वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. त्याच बरोबरच थेट मंत्र्यांच्या ताफ्याला कट मारल्याने हा विषय अधिक चर्चिला जात आहे. मराठवाड्यातही अवैध गोवंश वाहतुकीच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे अशा वाहतुकीला आळा घालण्याची गरज आहे.