Babasaheb’s statue will be beautified, MLAs gave funds
बाबासाहेबांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण होणार, आमदारांनी दिला निधी
Dhule धुळे : शहरातील नकाणे रोड डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व्हावे यासाठी तेथील नागरिकांनी धुळे शहराचे आ. फारुख शाह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्याची दखल घेत या कामासाठी २० लक्ष रुपयाचा निधीचे पत्र आमदार निधीतुन दिले होते. त्यानुसार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण कामाचे शुभारंभ आ. फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरला निकम व सूत्रसंचालन राज वाघ यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात आ. फारुख शाह यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोकुळ भामरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर भगवान गवळी, नगरसेवक कमलेश देवरे, प्रफुल्ल पाटील, डॉ. जितेंद्र ठाकूर, भटू गवळी, राजू हाके, डॉ. दीपश्री नाईक, मंगला मोरे, बनूबाई शिरसाठ, राजू बैसाणे, अजय झाल्टे, मुकेश वाघ, सनी वाघ, अनिल पवार, गितांजली जाधव, मनिष शिरसाठ, रमा वानखेडे होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन वानखेडे, शुभम साबे, आनंद वानखेडे होते.