Victory Salute of Mahavikas Aghadi, Congress wins unopposed in market committee elections
महाविकास आघाडीची विजयी सलामी, बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसचे विजय चिंचोले बिनविरोध
Mahavikas Aghadi News धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकित महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार विजय वसंतराव चिंचोले हे व्यापारी मतदारसंघातून बिनविरोध निवडून आल्याने महाविकास आघाडीने या निवडणूकित विजयी सलामी दिली आहे.
या निवडणूकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेने (उबाठा) च्यावती ने आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने शेतकर्यांच्या हिताचा विचार करणारे तसेच शेतकरी, व्यापारी, हमाल मापाडी यांचा समन्वय साधणारे सर्व 18 जागांसाठी शेतकरी विकास पॅनल जाहिर केले आहे. दरम्यान, शेतकरी विकास पॅनलचे धुळे तालुक्यातील बाजार समितीच्या मतदारांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत आहे.
शेतकरी विकास पॅनलमध्ये शेतकर्यांशी जिव्हाळ्याचे नाते असणारे, शेतकर्यांच्या समस्यांची जाण असलेले व त्यांना न्याय मिळवून देणारे उमेदवार महाविकास आघाडीने उभे केले आहे. त्यामुळे विरोधी भाजपा-भदाणे गटाच्या उमेदवारांना माघारीनंतरच्या पहिल्याच टप्प्यात खिंडीत गाठले आहे. शेतकर्यांशी दांडगा संपर्क आणि बाजार समितीच्या विकासाचा दृष्टीकोन असलेले महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनलमधील उमेदवार असल्याने मतदारांनी या पॅनलचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे.
महाविकास आघाडीचे विजयी सलामी
धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकित महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमदेवार व्यापारी मतदारसंघातून विजय वसंतराव चिंचोले हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने विजयी सलामी देत विजयाकडे घौडदौड सुरु केली आहे. दरम्यान व्यापारी मतदारसंघातून महादेव चेतराम परदेशी हे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने त्यांनी आ. कुणाल पाटील यांनी भेट घेत आभार व्यक्त केले. यावेळी आ. कुणाल पाटील यांनी बिनविरोध निवडून आलेल्या दोघा उमेदवारांचा सत्कार करुन त्यांचे अभिनंदन केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार
सहकार संस्था मतदार संघातून बाजीराव हिरामण पाटील (चिंचखेडे), गुलाबराव धोंडू कोतेकर (शिरुड), विशाल दिलीप सैंदाणे (मुकटी), यशवंत दामू खैरनार (विंचूर), ऋषीकेश अनिल ठाकरे (मोराणे प्र.ल.), नानासाहेब देवराम पाटील (बुरझड), गंगाधर लोटन माळी (रतनपुरा), नयना संदिप पाटील (मांडळ), छाया प्रकाश पाटील (लोणखेडी), कुणाल दिगंबर पाटील (बोरविहीर), विश्वास खंडू शिंदे (आर्वी), ग्रामपंचायत मतदार संघातून योगेश विनायक पाटील (सायने), संभाजी पुंडलिक देवरे (सावळदे), रावसाहेब धर्मा पाटील (काळखेडे), सुरेश वंजी भिल (शिरधाणे प्र.नेर), हमाल मापडी मतदारसंघातून सतिष यादव खताळ (धुळे) हे उमेदवार महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवित आहेत.