One and a half hundred kilos of garbage collected from the Panjra river basin
पांझरा नदीपात्रातून दीडशे किलो कचरा गोळा
Dhule धुळे : राष्ट्रीय छात्र सेनेच्यावतीने देश पातळीवर पुनीत सागर अभियानातंर्गत नदी व तलावांची स्वच्छता करून पर्यावरणाचे संवर्धन करण्यात येत आहे. या अभियानात 48 महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. धुळेच्या वतीने शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करण्याबाबत जनजागृती, नदी-नाले व तलावांची स्वच्छता केली जात आहे.
एनसीसीच्या वतीने पांझरा नदीत व परिसरात पुुनित सागर स्वच्छता अभियान राबवले. या अभियानात सहभागी छात्र सैनिकांनी गणपती मंदिरासमोरील झुलत्या पुलाखालील नदीपात्राची स्वच्छता केली. नदीपात्रातील प्लास्टिकच्या पिशव्या, जुने फेकलेले कपडे उचलून तेथील काटेरी झुडूपे काढण्यात आली. छात्र सैनिकांनी नदीत साचलेला कचरा प्लास्टिक पिशव्या एकत्रित केल्या. जवळपास 150 किलो कचरा जमा करुन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.
या अभियानात 48 महाराष्ट्र बटालियनच्या परिक्षेत्रातील एस. एस. व्ही. पी. एस. कला व वाणिज्य महाविद्यालय, विज्ञान महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, झेड. बी. पाटील महाविद्यालय, विद्यावर्धिनी महाविद्यालय, जे. आर. सिटी हायस्कूल, न्यू सिटी हायस्कूल येथील 53 छात्र सैनिकांनी सहभाग नोंदवला.
या मोहिमेच्या यशस्वीतेकरीता कंमाडिंग ऑफिसर कर्नल पराग कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात मेजर डाॅ. महेंद्रकुमार वाढे, कॅप्टन डाॅ. शशिकांत खलाणे, थर्ड ऑफिसर आर. पी. सूर्यवंशी, सुभेदार हरमिंदर सिंग, हवालदार गुरुनेक सिंग यांनी प्रयत्न केले.