Defense Capacity Festival for Environmental Conservation, Bharat Petroleum initiated
पर्यावरण संवर्धनासाठी संरक्षण क्षमता महोत्सव, भारत पेट्रोलियमने घेतला पुढाकार
धुळे : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी भारत सरकारतर्फे २४ एप्रिलपासून संरक्षण क्षमता महोत्सव राबविण्यात येत आहे. यासाठी भारत पेट्रोलियमने पुढाकार घेतला आहे. भारत पेट्रोलियमचे सहायक प्रबंधक अश्विनी यादव यांनी धुळे येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी धुळे, नंदुरबारचे सहायक व्यवस्थापक अनिमेश खंपारिया उपस्थित होते. सक्षम-२०२३ संरक्षण क्षमता महोत्सव हा एक महत्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे, जो देशाच्या ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सुरू केला आहे. जीवाश्म इंधनावरील व्यर्थ खर्चाला आळा घालणे, परकीय तिजोरीवरील वाढते ओझे कमी करणे आणि जीवाश्म इंधनांच्या ज्वलनामुळे निर्माण झालेल्या हरितगृह वायूच्या प्रतिकूल परिणामापासून पर्यावरणाचे रक्षण करणे हे या कार्यक्रमाचे अंतिम लक्ष्य आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच तेल उद्योगाचे राज्यस्तरीय समन्वयक जनजागृती करण्यासाठी संबंधित राज्य सरकारच्या सक्रिय सहभागाने विविध उपक्रम हाती घेतात. पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना पेट्रोलियम उत्पादनांच्या संवर्धनाची जनजागृती करण्यासाठी, इंधन-कार्यक्षम उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पेट्रोलियम संवर्धनाचे धोरण आणि रणनीतीचा प्रस्ताव ठेऊन, सरकारला मदत करण्यासाठी आघाडीवर आहे. तसेच २४ एप्रिल ते ८ मे या कालावधीत ऊर्जा संरक्षण ‘नेट झिरो’कडे Energy Conservation towards ‘Net Zero’ च्या दिशेने ऊर्जा संरक्षण या टॅगलाइनसह सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव) 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून, महाराष्ट्रातील तेल उद्योगाने २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रमुख पाहुणे तेल कंपन्यांनी आयोजित केलेल्या रांगोळी आणि तेल संवर्धनपर लघू नाटिकाची पाहणी करतील. ज्यामधे शालेय विद्यार्थी सहभागी होत आहेत. पुढील पंधरा दिवसामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी समूह संभाषण/ वादविवाद, कॉलेजमध्ये भित्तीचित्र स्पर्धा, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, लेख लेखन, पत्रकार परिषद, प्रेस विज्ञप्ति, रेडिओवरील जिंगल्स जनजागृतीसाठी प्रसारित केले जाईल. सक्षम-२०२३ दरम्यान महाराष्ट्र राज्यात हजारांपेक्षा जास्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. इंधन आणि तेल संवर्धनासाठी शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांचा त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सत्कार करण्यात येईल.