• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home चंदेरी दुनियाँ

Marathi Movie ‘मराठी पाऊल पडते पुढे’मध्ये अहिरानीचा डंका, गायक कलावंत प्रविण माळी यांची मजेदार प्रतिक्रिया ऐका

no1maharashtra by no1maharashtra
23/04/2023
in चंदेरी दुनियाँ, धुळे
0
0
SHARES
416
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Listen to Ahirani’s Danka, Singer Artist Pravin Mali’s funny reaction in ‘Marathi Paol Padte Udaya’

‘मराठी पाऊल पडते पुढे’मध्ये अहिरानीचा डंका, गायक कलावंत प्रविण माळी यांची मजेदार प्रतिक्रिया ऐका

Dhule News धुळे : मराठीसोबतच अहिरानी गाणी आणि संवाद असलेला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा चित्रपट पाच मे रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम एका कार्यक्रमानिमित्त रविवारी धुळ्यात होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत निर्माता प्रकाश बाविस्कर यांच्यासह कलावंतांनी चित्रपट पहाण्याचे आवाहन धुळेकरांना केले.

Listen to Ahirani’s Danka, Singer Artist Pravin Mali’s funny reaction in ‘Marathi Paol Padte Udaya’

छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिर धुळे येथे चित्रपटाच्या संदर्भात पत्रकार परिषद झाली. निर्माते प्रकाश बाविस्कर, चित्रपटाचा मुख्य अभिनेता चिराग पाटील व मुख्य अभिनेत्री सिद्धी पाटणे, अहिरानी कलावंत प्रविण माळी, विजया मानमोडे, कवी जगदिश देवपूरकर, शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉ. सुशिल महाजन उपस्थित होते.

मराठी मालिका विश्‍वातून बॉलीवूडपटात झळकलेला आणि स्टार क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा चिरंजीव अभिनेता चिराग पाटील आणि ‘गोव्याच्या किनाऱ्यावर…’ रुपेरी वाळूत सोनेरी लाटांवर स्वार झालेली अभिनेत्री सिद्‌धी पाटणे यांच्या लव्हस्टोरीने सजलेला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा सिनेमा ५ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने चिराग आणि सिद्धी हे प्रथमच एकत्र आले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीला हवा असलेला आणि सिनेमाच्या कथानकाला साजेसा असा उंच शरिरयष्टी आणि देखणा नायक चिरागच्या रुपाने मिळाला आहे. म्युझिक अल्बमच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली सौंदर्यवती सिद्धी पाटणेची रोमँटीक साथ चिरागला लाभली आहे. रीयल लाईफमध्ये स्टाईल आयकॉन असणाऱ्या ह्या दोन्ही कलाकारांची ‘मराठी पाऊल पडते पुढे’ ह्या सिनेमातील केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहाणं औत्सुक्याचे ठरेल.

नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा ज्येष्ठ विधीज्ज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या हस्ते १३ एप्रिल रोजी दादर येथे करण्यात आला. ‘मराठी पाऊल पडते पुढे, ह्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हा चित्रपट मराठी तरुणांना संघर्ष करण्याची प्रेरणा देणारा आहे, याची मला खात्री झाली.आयष्य हे बागडण्याचे क्रीडांगण नसून प्रतिकुल परिस्थितीत झुंज देण्याचं रणांगण आहे, हा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल. निर्माते प्रकाश बावीस्कर हे माझ्या जिल्ह्यातील आहेतच पण माझे चांगले मित्रही आहेत, मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असे गौरवोद्गार विशेष सरकारी वकील पद्‌मश्री उज्ज्वल् निकम यांनी चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यानिमित्त काढले.

मराठी माणूस हा केवळ नोकरीत रमणारा नाही तर व्यवसायात उतरून नोकऱ्या देणारा होऊ शकतो, असे वातावरण हा चित्रपट निर्माण करेल, अशी आशा आहे. मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघ हा निर्माता प्रकाश बाविस्कर आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या सोबत आहे, अशी ग्वाही सुरेश हावरे यांनी या प्रसंगी दिली.

मराठी पाऊल पडते पुढे हे शीर्षक वाचून चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिक वाढते. असामान्य कर्तृत्व गाजवलेल्या अनेक मराठी दिग्गजांनी जगाच्या नकाशावर आपली पताका डौलाने फडकवली. पण, तरीही एकूण मराठी भाषिकांमध्ये व्यावसायिकता, उद्यमशीलता आणि व्यापक दृष्टीकोन ठेवून कार्य करण्याची वृत्ती नसते, असा एक ढोबळ समज आहे. अर्थात, त्याला अनेक कारणे असू शकतात. स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी संघर्ष हा अटळ आहे, आणि तो करण्यासाठी आजचा मराठी तरूण कुठेही कमी नाही. फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणणाऱ्यांची गरज आहे. ही गरज, प्रेरणा आणि ऊर्जा प्रभावी मनोरंजनाद्‌वारे देण्यासाठी तसेच समस्त मराठी मन आणि मनगटे मजबूत करण्यासाठी निर्माता प्रकाश बाविस्कर यांची निर्मिती व शिवलाईन फिल्म्सची प्रस्तुती असलेला “मराठी पाऊल पडते पुढे’ हा चित्रपट ५ मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

मराठी तरुणांना व्यसायाकडे वाटचाल करण्याकरीता प्रोत्साहन देणारा आणि संघर्षातून यश कसे प्राप्त करता येते याचे मार्गदर्शन करणारा हा चित्रपट आहे. निर्माते प्रकाश बाविस्कर हे सुध्दा एक व्यवसायिक आहेत. लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांनी लिहिलेल्या कथेमध्ये व्यवसायाऐवजी मराठी माणूस नोकरीला जास्त महत्व देतो. पण, काही मोजक्या व्यक्तीच व्यवसायाकडे वळतात. मात्र नायकाला इतर प्रस्थापित व्यावसायिकांकडून त्रास होतो. प्रस्थापित व्यावसायिक राजकीय मंडळी व अधिकारी यांच्याशी अभद्र युती करुन येनकेन प्रकारे उभरत्या व्यावसायिकांना त्रास देतात. त्याविरोधात नायक करीत असलेला संघर्ष, त्याची व्यावसायिक मानसिकता, सचोटी व अडचणीतून मार्ग काढण्याचा रोख कसा असावा? हे चित्रपटाच्या माध्यमातून मांडले आहे.

चित्रपटाच्या मांध्यमातून येणाऱ्या निव्वळ नफ्यातील दहा टक्के रक्‍कम कलाकारांना आणि उर्वरीत भाग हा मराठी तरुणांना व्यवसाय मार्गदर्शनासाठी, आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांसाठी आणि वृध्दाश्रमासाठी देऊ केला आहे, म्हणून हा चित्रपट प्रत्येकाला पाहावाच लागेल. त्याचबरोबर चित्रपटाचे लकी ड्रॉ तिकीट मिळविण्यासाठी ८९५५४४११३३ या क्रमांकावर मिस कॉल देण्याचे आवाहन निर्माता प्रकाश बाविस्कर यांनी केले आहे.

अकात फिल्म्सचे चंद्रकांत विसपुते हे ह्या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संगीत दिग्दर्शक समीर खोले यांनी सिनेमाची सर्व गाणी संगीतबद्ध केली आहेत. स्वप्नील मयेकर लिखित-दिग्दर्शित तसेच चिराग पाटील, सिद्‌धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, सतीश सल्लागरे, संजय क्षेमकल्याणी आणि प्रदीप कोथमिरे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मनोरंजनाबरोबरच मराठी तरुणांच्या स्वप्नांना बळ देणारा आणि भविष्याप्रती जागरुक करणारा ठरेल, असे निर्माते प्रकाश बाविस्कर म्हणाले.

‘मराठी पाऊल पडते पुढे’ Movie

Tags: actor chirag patilahirani actor pravin maliahirani movieahirani songsakat filmsanant jogchandrakant vispuecricketer sandip patil biographyletest marathi movieListen to Ahirani's Danka Singer Artist Pravin Mali's funny reaction in 'Marathi Paol Padte Udaya'marathi paul padte pudhemarathi paul padte pudhe ahirani songmarathi paul padte pudhe moviemarathi paul padte pudhe songsmusic director sameer kholepradip kothmireproducer prakash baviskarreleasing on 5th may 2023sanjay kshemkalyanisatish pulekarsatish salagresiddhi patnevijay manmodewriter and director swapnil mayekar
ADVERTISEMENT
Previous Post

Fellowship of tourism corporation पर्यटन महामंडळाची फेलोशिप, तरुणांना मिळणार दरमहा ४० हजार

Next Post

Atul Sonawane on Kunal Patil महाविकास आघाडीत फुट, मार्केट कमिटी निवडणुकीच्या पॅनलमधून शिवसेना बाहेर

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

20/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us