MLA aggressive on electricity, water issue, warning to lock the municipal corporation
वीज, पाणी प्रश्नावर आमदार आक्रमक, महापालिकेला कुलूप ठोकण्याचा इशारा
Dhule News धुळे : वीज प्रश्नी शिवसेनेने केलेला रास्तारोको आणि पाणी प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेत केलेले आंघोळ आंदोलनानंतर, आमदार डॉ. फारुख शाह चांगलेच भडकले आहेत.
आवश्यक त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून २० मेपर्यंत दोन दिवसाआड पाणी पुरवठा करा, अन्यथा मोर्चा काढून महापालिकेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकू! असा सज्जड इशारा धुळे मनपाच्या अधिकार्यांना तर शहरातील वीज पुरवठा सुरळीत न राहिल्यास संबंधित अधिकार्यांच्या तोंडाला काळे फासू असा दम वीज वितरणच्या अधिकार्यांना आमदारांनी दिला.
धुळे शहरातील विस्कळीत पाणी पुरवठा व अनेक वेळा खंडित होणारी वीज या समस्यांवर प्रशासकीय अडचणी समजावून घेण्यासाठी आ. फारूक शहा यांनी बुधवारी गुलमोहर या शासकीय विश्राम गृहाच्या दालनात वीज वितरण कंपनी व महापालिका अधिकार्यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी महापालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता भीमराव म्हस्के, कार्यकारी अभियंता पाटील, महापालिकेचे अभियंता कैलास शिंदे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत ओगले, वीज विभागाचे कर्मचारी सी. सी. बागुल उपस्थित होते.
बैठकीत शहराच्या पाणी पुरवठ्यावरुन वीज कंपनीचे अधिकारी व महापालिका अधिकारी यांच्यातच जुंपली. वीज खंडित होणे किंवा कमी दाबाने वीज पुरवठा होणे यामुळे पाणी ओढणारे पंप पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. यामुळे शहराला पाणी पुरवठा करणार्या पाण्याच्या टाक्या वेळापत्रकानुसार भरू शकत नाहीत, अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्यांनी दिली तर वीज कंपनीच्या अधिकार्यांनी तांत्रिक बिघाड होताच आमचे पथक घटनास्थळी पोहोचून लगोलग वीज सुरळीत करण्याचा प्रयत्न करते.
मात्र वादळ वार्यामुळे वीज पुरवठा खंडित होतो, त्यात मनपाचे पंप बंद पडतात अशी सफाई वीज वितरणच्या अधिकार्यांनी दिली. एकमेंकावर दोषारोप करण्याचा प्रकार घडला.
हेही वाचा
खंडित होणाऱ्या विज पुरवठ्यामुळे शिवसेना आक्रमक, भर उन्हात रास्तारोको आंदोलन
पाण्यासाठी तरूणाने महापालिकेतच केली आंघोळ, धुळ्यात मनसेचे अनोखे आंदोलन