Honoring role model mothers in Dhula
धुळ्यात आदर्श मातांचा सन्मान
Dhule News धुळे : येथील संतागार प्रतिष्ठान आणि लुंबिनी बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने कालकथित सुमती मधुकर चव्हाण यांच्या स्मरणार्थ आदर्श माता सन्मान सोहळा आणि बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
‘बुद्ध धम्म आणि आनंदी जीवन’ या विषयावर शिरपूरच्या एसपीडीएम महाविद्यालयाचे व्याख्याते प्रा. डॉ. नागोराव डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम खानदेश दलित शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र निळे, महानगरपालिकेच्या कर निर्धारण अधिकारी पल्लवी शिरसाठ आणि लुंबिनी बुद्धविहाराचे भैय्या पवार उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपमहापौर नागसेन बोरसे यांच्या मातोश्री कालकथित इंदुबाई दामोदर बोरसे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. दीपक शेजवळ यांच्या मातोश्री सिंधुताई किशोर शेजवळ यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. दीपक शेजवळ यांनी कोरोना काळात धुळे येथे हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे कोरोना नोडल अधिकारी म्हणून काम करताना उल्लेखनीय कार्य केले होते. अत्यंत जबाबदारीच्या या कामात त्यांच्या आई आणि कुटूंबाने खंबीरपणे साथ दिली होती.
धुळे शहरातील साक्री रोडवरील लुंबिनीवन परिसरातील लुंबिनी बुद्ध विहारात सोमवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला.