Six people who stole from Dhule MIDC were shackled
धुळे एमआयडीसीत चोरी करणाऱ्या सहा जणांना ठोकल्या बेड्या
Dhule News धुळे : शहरा जवळील अवधान एमआयडीसी मधून तब्बल 63 हजारांचे सोयाबीन चोरून नेणाऱ्या सहा चोरट्यांचा मुसक्या आवळण्यात मोहाडी पोलिसांना यश आले, असून चोरट्यांच्या ताब्यातून चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
७ मे रोजी फिर्यादी रवींद्र विलास येडे (जयदुर्गा इंडस्ट्रीज एमआयडीसी अवधान धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोहाडी नगर पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात फिर्यादी यांचे मालकीचे जयदूर्गा इंडस्ट्रीज येथून सोयाबीनचे ६३,२५० रुपये किंमतीचे २३ कट्टे प्रत्येकी ५० किलो वजनाचे कोणीतरी अज्ञात आरोपीतांनी चोरून नेले होते. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस.ऋषिकेश रेड्डी, यांच्या सूचनाप्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी मोहाडी नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि भूषण कोते, सपोनि प्रकाश पाटील, यांच्या नेतृत्वाखाली असई अशोक पायमोडे, पोना राहुल पाटील, जितेंद्र वाघ,मुकेश मोरे, बापूजी पाटील, जयकुमार चौधरी, अशांचे तपास पथक तयार करण्यात आले त्याद्वारे सदर पथकाचा गुन्ह्यातील आरोपींचा व चोरून नेलेले मालाबाबत गुन्ह्याचा तपास सुरू असताना तांत्रिक पुराव्याच्या विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्हा रवी यशवंत मालचे रा. दिवानमळा ता. धुळे, करण शांताराम सोनवणे रा. दिवानमळा ,नवनाथ महादू सोनवणे रा. दिवानमळा,सोमनाथ राजू सोनवणे रा.लळिंग ता. धुळे, आकाश सुकदेव ठाकरे, रा.लळिंग , दगा रामदास पवार (भिल) रा. जुन्नेर ता. धुळे यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेवून विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्यांच्या ताब्यातून दाखल गुन्ह्यातील चोरी गेलेला सोयाबीन माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण १ लाख ३१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस ऋषिकेश रेड्डी, यांचे मार्गदर्शनाखाली मोहाडी नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि भूषण कोते, सपोनि प्रकाश पाटील, यांचे नेतृत्वात असई अशोक पायमोडे, पोना राहुल पाटील , पोकॉ जितेंद्र वाघ,मुकेश मोरे, बापूजी पाटील, जयकुमार चौधरी, मयूर गुरव अशांनी केली आहे.