How to view ration card online?
रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?
तुमचे रेशन कार्ड ऑनलाईन पहाण्यासाठी तुम्हाला आधी तुमच्या रेशन कार्डचा नंबर ऑनलाईन पहावा लागेल. तो कसा पहायचा हे आपण आधी पाहू…
How to Check Ration Card Number Online?
रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कस पहायच?
तुमच्या रेशन कार्डचा नंबर तुम्ही स्वतः ऑनलाईन पाहू शकता. रेशन कार्ड नंबर ऑनलाईन शोधण्यासाठी सगळ्यात आधी Google वर mahafood.gov.in असे सर्च करा. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट Open होईल. या वेबसाईटवर उजवीकडील ऑनलाईन सेवा या रकान्यात सगळ्यात शेवटी असलेल्या ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या पर्यायावर क्लिक करा.
– त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवरील उजवीकडील मराठी या पर्यायावर क्लिक केले की मराठीत माहिती दिसेल.
– त्यानंतर वरच्या बाजूच्या साईन इन किंवा रजिस्टर या रकान्यातील ऑफिस लॉग इन किंवा सार्वजनिक लॉग इन या दोन पर्यायांपैकी सार्वजनिक लॉग इन या पर्यायावर क्लिक करा. (लॉग इन डिटेल्स टाका.)
– इथे तुम्ही भाषा इंग्लिश ठेवू शकता किंवा लोकल लँग्वेज या पर्यायावर क्लिक करून मराठीत पुढे चालू ठेऊ शकता.
– त्यानंतर खाली दोन पर्याय असतील. एक म्हणजे नोंदणीकृत युझर आणि दुसरा नवीन युझर. आपण पहिल्यांदाच या वेबसाईटवर येत असल्याने नवीन युझर या पर्यायावर क्लिक करा.
– त्यानंतर एक नवीन पेज Open होईल. इथे Do you have ration card आणि No ration card असे दोन पर्याय दिसतील.
– यातल्या No ration card या पर्यायावर क्लिक करा.
इथे सुरुवातीला तुमचे स्थानिक भाषेतले नाव, ते तुम्ही मराठीत लिहू शकता, नाही लिहिले तरी चालेल. त्यानंतर आधारवर जे नाव आहे आणि ते जसे आहे तसेच लिहायचे आहे. त्यानंतर आधार नंबर, मोबाईल नंबर टाकायचा आहे. पुढे मेल आयडी असेल तर तो लिहायचा आहे, त्यानंतर आधार कार्डवरील जन्मतारीख टाकायची आहे. नंतर लिंग निवडायचे आहे आणि सगळ्यात शेवटी कॅप्चा टाकायचा आहे.
ही माहिती भरून झाली की Verify Aadhar या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
– तुम्ही जर मोबाईलवर हे पाहत असाल तर तुम्हाला स्क्रीनवर सगळ्यात वरती लाल अक्षरात एक मेसेज दिसेल. पण जर तुम्ही लॅपटॉपवरती किंवा पीसीवरती हे पाहत असाल तर Verify Aadhar या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधी उजव्या कोपऱ्यामध्ये येऊन झूमचे प्रमाण १०० किंवा त्याहून कमी टक्क्यांवर आणायचे आहे. त्यानंतर तुम्हाला लाल अक्षरातला मेसेज स्पष्टपणे दिसेल.
Aadhar card Already exist for another RC. Details are as follows-District Name: ‘Dhule’, Village Name: ‘Chilane’, RC ID: ” and MEMBERID: ’01’
असा हा मेसेज असेल.
याचा अर्थ तुमचे आधार कार्ड रेशन कार्डला ऑलरेडी लिंक केलेले आहे. पुढे तुमचा जिल्हा, गावाचे नाव आणि आरसी आयडी म्हणजे बारा अंकी रेशन कार्ड नंबर दिलेला असेल.
रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?
आरसी नंबर मिळाला की तुम्ही तुमचे रेशन कार्डही ऑनलाईन पाहू शकता.
– त्यासाठी तुम्हाला पुन्हा Google वर जाऊन rcms.mahafood.gov.in असे सर्च करायचे आहे.
त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल.
– या पेजवरील उजवीकडील Ration Card या पर्यायाखालील Know your ration card यावर क्लिक करा.
– त्यानंतर कॅप्चा टाकून Verify या बटनावर क्लिक करा.
– त्यानंतर रेशन कार्ड नंबर टाका. (आता आपण ऑनलाईन जो रेशन कार्ड नंबर पाहिला तो इथे टाका.)
– view report वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या रेशन कार्डसंबंधित माहिती ओपन होईल.
स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की, सुरुवातीला रेशन कार्ड नंबर आणि मग त्यापुढे Print Your Ration Card असा पर्याय दिलेला आहे. यावर क्लिक केले की तुमचे रेशन कार्ड ओपन होईल. यावर रेशन कार्ड नंबर, कुटुंब प्रमुखाचे नाव आणि पत्ता, रेशन दुकानदाराचा नंबर-नाव-पत्ता, कुटुंबातील सदस्यांची माहिती, तसेच तुम्हाला कोणत्या योजने अंतर्गत धान्य मिळते आणि ते किती मिळायला हवे, याची माहिती दिलेली असते.
Ashwini Patole, Mumbai
हेही वाचा