Let’s understand the ration card, see how much grain is available!
चला रेशनकार्ड समजून घेऊ, धान्य किती मिळते तेही पाहू!
महाराष्ट्र राज्यात पिवळे, केसरी आणि पांढरे अशी तीन प्रकारची रेशन कार्ड आहेत. राज्य सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाच्या वेबसाईटनुसार, पिवळ्या रंगाचे रेशनकार्ड त्यांना मिळते ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १५ हजार रुपयांपर्यंत असते. यालाच बीपीएल म्हणजे दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी म्हणतात. केशरी रेशन कार्डसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये १५ हजार पेक्षा जास्त, पण एक लाखपेक्षा कमी असावे लागते. यालाच एपीएल म्हणजे दारिद्र्य रेषेवरील लाभार्थी म्हणतात. तर ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख आहे अशा कुटुंबाला पांढरे रेशन कार्ड देण्यात येते.
अंत्योदय कुटुंब आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी गट
केंद्र शासनाच्या किमान सामायिक कार्यक्रमा अंतर्गत गरिबांना केंद्रस्थानी ठेवून दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरवण्याची योजना महाराष्ट्रात एक जून १९९७ पासून सुरू करण्यात आली.
या योजनेंतर्गत सुरुवातीला गरीब कुटुंबाला दरमहा १० किलो अन्नधान्य प्रचलित दराच्या अर्ध्या किंमतीत उपलब्ध करून दिले जात होते. यात प्रामुख्याने गहू आणि तांदूळ दिले जातात.
एक फेब्रुवारी २०१४ पासून राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानुसार लाभार्थ्यांचे अंत्योदय गट आणि प्राधान्य गट असे दोन गट करण्यात आले.
अंत्योदय गटाच्या लाभार्थ्यांना दरमहा ३५ किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात येते, तर प्राधान्य गटाच्या लाभार्थ्याना दरमहा प्रतिव्यक्ती पाच किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात येते.
– Siddharth More, Dhule
हेही वाचा