Scheduled Caste, Scheduled Tribe farmers will get drip irrigation, frost irrigation
अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना मिळणार ठिंबक सिंचन, तुषार सिंचन
Yojana धुळे : राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत अनुसूचित जमाती व अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांनी ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब- अधिक पीक योजनेंतर्गत ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजनांचा लाभ घेण्यासाठी अनूसूचित जमाती व जाती प्रवर्गातील लाभार्थ्याचे अर्ज भरण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध वैयक्तिक लाभाच्या प्रमुख योजनांचा एकत्रितपणे महाडीबीटी या ऑनलाईन पोर्टलव्दारे योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर जास्तीत जास्त संख्येने अर्ज करावेत. अनूसूचित जमाती व अनुसूचित जाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी या प्रणालीवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत.
अर्ज करण्याची कार्यपध्दती अशी : https://mahadbtmahait.gov.in या महाडीबीटी संकेतस्थळावर जावे. या संकेतस्थळावर शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करावे, नवीन अर्जदार नोंदणी करणे, वापरकर्ता आयडीवर क्लिक केल्यानंतर “वापरकर्ता आयडी व पासवर्ड व त्याखाली प्रतिमेत दर्शविलेले शब्द भरून “लॉग इन करा” यावर क्लिक करा, अर्जदाराची वैयक्तिक माहिती, पत्ता व प्रवर्ग भरावा, शेत जमिनीचा तपशील भरावा, पिकाचा तपशील भरावा त्यानंतर बँकेचा तपशील भरावा. त्यानंतर विविध योजनांची व बाबींची निवड करावी. वरील महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेल वर किंवा 020-25511479/02562-234580 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.