Marathi Paul Padte Pudhe Waste Management and Water Conservation Works in Bhirdane Village Even Celebrities Are Fascinated
भिरडाणे गावातील कचरा व्यवस्थापन अन् जलसंधारणाच्या कामांची सेलीब्रेटिंनाही भुरळ
Dhule धुळे : येथील मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्थेने धुळे परसबाग निर्मिती आणि रक्तक्षय मुक्त गाव करण्यासाठी भिरडाई भिरडाणे, सांजोरी, कुंडाणे (वार) ही गावे दत्तक घेतली आहेत. या कामाची दखल घेत टिव्ही स्टार, फिल्म स्टार राजेंद्र केदार यांनी या गावांना भेट देत संस्थेने केलेल्या कामांची पाहणी केली तसेच माहिती जाणून घेतली.
भिरडाणे गावाने नऊ किलोमीटरपेक्षा अधिक नाला खोलीकरण करून जलसंधारणाचे मोठे काम उभे केले आहे. हे काम पाहुन राजेंद्र केदार प्रभावीत झाले. शेणकचरामुक गावांमधील स्वच्छतेविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. शेणकचऱ्याचे व्यवस्थापन गावापासून लांब अंतरावर केले आहे. त्यामुळे गावात प्रवेश केला की, गावातील टापटीप पाहुन मन प्रसन्न होते, अशा शब्दात त्यांनी संस्थेने केलेल्या कामांचे कौतुक केले. ग्रामपंचायतीसमोरील झाडाखाली ऊभे राहुन, ग्रामपंचायत प्रांगणात सर्व ग्रामस्थ महीला पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करताना सार्वजनिक स्वच्छता अभियानात गावाने मारलेली गरुडभरारी अचंबित करणारी ठरली, असे आत्मविश्वासाने सांगितले. सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी एकीचे बळ दाखवुन काम करतात व यश खेचून आणतात हे पहाता आले. पावसाळ्यात ९ किलोमीटरहून जास्त पाण्याचा प्रवाह अडवून आजुबाजूच्या विहीरी पाण्याने तुडुंब भरतात, असे सांगण्यात आले. शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. वनराईने नटलेले गाव पाहुन मन प्रसन्न होते. अशा आदर्श गावात संस्थेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने नियोजन करुन केलेली कामे आदर्श आहेत. गटनेते राजेश पाटील, वकिल शितल जावरे, सरपंच, ग्रामसेविका, बचतगट अध्यक्षा, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. आमच्या गावात चित्रपट कलावंत आले. गावाच्या प्रगतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. याचा आनंद ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आला.
सत्कार समारंभात बोलताना चित्रपट कलावंत राजेंद्र केदार यांनी सांगितले की, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. त्यात अहिरानी गीत असल्याचेही त्यांनी सांगितले. भिरडाणे गावात एका गाण्याची शुटींग आगामी काळात करण्यात येईल. भिरडाणे गाव चित्रपटात मोठ्या पडद्यावर झळकलेले असेल अशी ग्वाही दिली.
यावेळी नंदुरबार येथील दलाई लामा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत अमृतसागर उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने गटनेते राजेश पाटील व संस्थेच्या वतीने डॉ. डी. एम. आखाडे यांनी आभार मानले.