Playing with children’s lives, poor quality nutrition in Anganwadis
बालकांच्या जिवाशी खेळ, अंगणवाड्या मध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार
Dhule धुळे : जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिला जात आहे. बालकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. पोषण आहाराची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षाचे गटनेते पोपटराव सोनवणे यांनी गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत केली.
जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेची टेस्टींग अपयशी झालेले आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना नवीन योजना देऊन पाणीपुरवठा करण्यात यावा, तसेच हट्टी खुर्द येथे शिक्षकांची त्वरित नियुक्ती करावी अशी मागणी सदस्यांनी स्थायीच्या सभेत केली.
जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखालीझाली. अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या सभेला कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, शिक्षण सभापती महावीरसिंग रावल, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. उपस्थित होत्या. साक्री तालुक्यातील हट्टी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याठिकाणी ११ शिक्षकांची गरज असताना केवळ आठच कार्यरत आहे. त्यातही आता चार शिक्षकांची बदली झालेली आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर होणार असून, या शाळेवर शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी विरोधी गटाचे सदस्य पोपटराव सोनवणे यांनी केली. तर आंतरजिल्हा बदलीने ३९ शिक्षक जिल्ह्यात आले असून, त्यापैकी काहींची तेथे नियुक्ती केली जाईल असे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याची काही ठिकाणी टेस्टीग करण्यात आली. मात्र अनेक ठिकाणी ही टेस्टींग फेल गेलेली आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या पार्श्वभूमिवर टंचाईग्रस्त गावांना जलजीवन मिशन अंतर्गत नवीन योजना देऊन पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी सदस्य राम भदाणे यांनी केली.
दरम्यान, जिल्ह्यात होणारी कापसाची लागवड बघता, १० लाख ३० हजार कापूस बियाण्याची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. त्यापैकी ७ लाख कापूस बियाण्यांची पाकिटे उपलब्ध झालेली आहेत. तसेच जिल्ह्यासाठी ५५ हजार मेट्रीक टन खतांचा साठा शिल्लक असून, तो जुलै अखेरपर्यंत पुरेल.
दरम्यान, जिल्ह्यात होणारी कापसाची लागवड बघता, १० लाख ३० हजार कापूस बियाण्याची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. त्यापैकी ७ लाख कापूस बियाण्यांची पाकिटे उपलब्ध झालेली आहेत. तसेच जिल्ह्यासाठी ५५ हजार मेट्रीक टन खतांचा साठा शिल्लक असून, तो जुलै अखेरपर्यंत पुरेल असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. कागदपत्रे न बघता सेविकेची नियुक्ती कशी केली? साक्री तालुक्यातील डोंगराळे येथे अंगणवाडीत एका सेविकेची नियुक्ती करण्यात आली. मात्र सहा महिन्यानंतर तिची नियुक्ती रद्द करण्यात आली. यावर पोपटराव सोनवणे यांनी महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, कोणत्या कारणास्तव सेविकेची नियुक्ती रद्द केली. तेव्हा महिला व बालकल्याण अधिकारी भदाणे म्हणाले, कागदपत्राच्या तपासणीत ते गाव महसूली नसल्याचे लक्षात आल्याने, नियुक्ती रद्द केली. त्यावर पोपटराव सोनवणे म्हणाले, नियुक्ती देताना कागदपत्रे बघितली जात नाही का? दरम्यान सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर या विषयावर पडदा पडला.