Ambedkari movement should be carried forward keeping in mind the ideal of Manojbhai Sansare
मनोजभाई संसारे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आंबेडकरी चळवळ पुढे न्यावी : एम. जी. धिवरे यांचे तरूणांना आवाहन
Dhule News धुळे : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते मनोजभाई संसारे यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. समाजातील सर्व घटकांसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांचे नाव अजरामर झाले. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरूणांनी आंबेडकरी चळवळ पुढे न्यावी, असे आवाहन ज्येष्ठ आंबेडकरी नेते एम. जी. धिवरे यांनी केले.
धुळे येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमीवर रविवारी दुपारी पॅंथर मनोजभाई संसारे यांच्या अभिवादन सभेत ते बोलत होते. या अभिवादन सभेत सर्वपक्षीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिवंगत मनोजभाई संसारे यांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमानंतर संदेश भूमीच्या उद्यानात बोधीवृक्षारोपण करण्यात आले.
ज्येष्ठ नेते एम. जी. धिवरे, वाल्मिक दामोदर, रिपाइं जिल्हाध्यक्ष शशीकांत वाघ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजित भोसले, किरण जोंधळे, कुंदन खरात, राहुल वाघ, सुरेश लोंढे, हरिश्चंद्र लोंढे, देविदास जगताप, भैय्यासाहेब ढीवरे, विलास करडक, रवी मोरे, अरविंद निकम, नितीन गायकवाड, योगेश ईशी, पोपटराव चौधरी, किरण गायकवाड, दीपक शिंदे, एस. आर. बागुल, नंदू बैसाणे, महेंद्र शिरसाठ, योगेश जगताप, राजेंद्र थोरात, महेंद्र महाले, जी. के. गवळे, वी. यु. वाघ, पोपटराव मोहिते, भगवान वाघ यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
या अभिवादन सभेचे आयोजन प्रसिद्ध विधिज्ज्ञ संतोष जाधव, हरिश्चंद्र लोंढे, दादा खंडारे, राज चव्हाण, संदेश भूमी समितीचे अध्यक्ष आनंद सैंदाणे, राहुल वाघ, कवी राकेश अहिरे, उमेश कढरे, हिरामण मालचे, प्रकाश बोरसे, कैलास अमृतसागर, रवींद्र भदाणे, शशि बोरसे, रमेश भदाणे, अजय वाघ, अर्जुन जाधव, अर्जुन शिकलकर, बाळासाहेब अहिरे आदींनी केले होते.