Bajirao Patil as Chairman of Dhule Bazar Committee, Yogesh Patil as Deputy Chairman unopposed
धुळे बाजार समिती सभापतीपदी बाजीराव पाटील, उपसभापतीपदी योगेश पाटील बिनविरोध
Dhule News धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बाजीराव पाटील तर उपसभापतीपदी योगेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ही निवडप्रक्रिया बाजार समितीच्या सभागृहात सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी अशोक बागल यांच्या अध्यक्षतेखाली सहायक निवडणूक अधिकारी राजेंद्र विरकर, नागेश पुकळे, बाजार समिती सचिव देवेंद्र पाटील, उपसचिव विशाल आव्हाड तसेच नवनिर्वाचित संचालकांच्या उपस्थितीत पार पडली.
सभापती पदासाठी बाजीराव हिरामण पाटील तर उपसभापतीपदासाठी योगेश विनायक पाटील यांनी अर्ज भरुन सादर केले. दोन्ही पदांसाठी या दोघांचे स्वतंत्र व एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली.
नवनिर्वाचित सभापती बाजीराव पाटील व उपसभापती योगेश पाटील यांचा माजी मंत्री रोहीदास पाटील, धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी कॉग्रेसचे पदिधिकारी उपस्थित होते.
निवडीनंतर सभापती, उपसभापतींच्या कार्यकर्त्यांनी वाजतगाजत गुलालाची उधळण करीत विजयोत्सव साजरा केला.