Start the clinic! Nagsen Borse’s warning to protest otherwise
दवाखाना सुरू करा! अन्यथा आंदोलन करण्याचा नागसेन बोरसे यांचा इशारा
Dhule News धुळे : शहरातील देवपूर भागात नागरी दलित वस्ती योजने अंतर्गत सुमारे ७५ लाख रुपये खर्च करून बांधलेला महानगरपालिकेचा दवाखाना तात्काळ सुरू करावा, तसेच त्या दवाखान्यामध्ये फर्निचर आणि डॉक्टरांची तसेच आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून तात्काळ नागरिकांच्या सेवेसाठी हा दवाखाना सुरू करावा, अशी मागणी माजी उपमहापौर नागसेन बोरसे यांनी आयुक्त देवदास टेकाळे यांच्याकडे केली.
देवपूरातील सुमारे पंधरा ते वीस हजार श्रमिक, गोरगरीब नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. तसेच नागरिकांचे खाजगी दवाखान्यात हजारो रुपये खर्च करतात, तो सामान्य नागरिकांचा खर्च वाचणार आहे.
धुळे महानगरपालिकेचा हा दवाखाना सुमारे ७५ लक्ष रुपये निधी मधून बांधण्यात आला आहे, मात्र त्यामध्ये धुळे महानगर पालिकेने अजून पर्यंत कुठलीही उपायोजना केलेली नाही. दवाखान्याला लागणारे फर्निचर तसेच मुबलक कर्मचाऱ्यांचा स्टाफ या दवाखान्यासाठी देऊन नागरिकांची महत्त्वाची गरज असलेला दवाखाना तात्काळ सुरू करावा, अशी मागणी माजी उपमहापौर पदाचा पदभार सोडताना केली आहे.
धुळे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर यांनी आपल्या स्थानिक विकास निधी मधून प्रभागात गेली अनेक विधायक कामे केली आहेत. नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून गेल्या अनेक वर्षापासून बंद पडलेला धुळे महानगरपालिकेला नागरिक दलित वस्ती निधी अंतर्गत ७५लक्ष रुपयांचा निधी खर्च करून दवाखाना उभारण्यात आला. मात्र या दवाखान्यामध्ये योग्य ते फर्निचर आणि मुबलक स्टाफ नसल्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरस होत आहे. नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेता उपमहापौर पदाचा पदभार सोडल्यानंतर लागलीच माजी उपमहापौर चांगलेच आक्रमक झाले आहे. नागरिकांची लक्षात घेता धुळे महानगरपालिकेने देवपुरातील हा दवाखाना तात्काळ सुरू करण्यात यावा अन्यथा येणाऱ्या काळात धुळे महानगरपालिकेत आयुक्तांच्या दालना बाहेर धरणे आंदोलन करू असा गंभीर इशारा माजी उपमहापौर नागसेन बोरसे यांनी दिला आहे.