Chhatrapati Shahu Maharaj replica memorial to be built in Dhule, work underway
धुळ्यात होणार छत्रपती शाहू महाराजांचे पुर्णाकृती स्मारक, काम सुरू
Dhule धुळे : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिराच्या आवारात शाहू महाराजांचे पुर्णाकृती स्मारक साकारत आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते रविवारी कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
शहरातील पारोळा रोडजवळील राजश्री शाहू महाराज नाट्यगृह आवारात छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारक कामाचे भूमिपूजन २८ मे रोजी संध्याकाळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री विजय नवल पाटील होते. छत्रपती शाहू महाराजांचे वंशज, जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रतिभा चौधरी, माजी उपमहापौर नागसेन बोरसे, महापालिका उपायुक्त विजय सनेर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील, स्थायी समितीच्या सभापती किरण राकेश कुलेवार, माजी आमदार प्रा. शरद पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष अनुप अग्रवाल, प्रकाश पाटील,माजी महापौर मोहन नवले, जयश्री अहिरराव, कल्पना महाले, चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, शितल नवले, प्रा. अरविंद जाधव, विनोद मित्तल, शामकांत सनेर, युवराज कारनकाळ, हर्ष रेलन, राजेश पवार, सारिका अग्रवाल, विमल पाटील, वंदना भामरे, किरण शिंदे, कुंदन पवार, योगीराज मराठे, एम.जी धिवरे, हरिश्चंद्र लोंढे, सुनील महाले, विनायक शिंदे, सुधाकर बेंद्रे, विकास बाबर, हिरामण गवळी, कुमार मराठे, गणेश मोरे, जगन ताकटे, चंद्रकांत ओगले, ओम खंडेलवाल, भिकन वराडे, सागर बेंद्रे, रवींद्र आघाव, प्रकाश बाविस्कर, राजाराम पाटील, श्रीरंग जाधव , नवाब बेग, राम सोनवणे, निंबा मराठे, वीरेंद्र मोरे, धीरज परदेशी, संदीप पाटोळे, संजय पाटील, निलेश नेमाने, प्रशांत नवले, सुनील चौधरी, जयेश माळी, संदीप अग्रवाल, हेमंत मराठे, मनोज मोरे,रजनीश निंबाळकर, यांच्यासह महानगरपालिका तसेच राजश्री शाहू महाराज स्मारक समिती प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविक हेमंत मदाने यांनी केले. राजवर्धन कदमबांडे यांनी आभार मानले.