Madh Kendra Yojana: Start a beekeeping business and get fifty percent subsidy
मध केंद्र योजना : मधमाशा पालन व्यवसाय करा अन् पन्नास टक्के अनुदान मिळवा
Dhule धुळे : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वीत झाली आहे. याकरीता पात्र व्यक्ती/ संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
योजनेची वैशिष्टे
मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुतंवणुक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष/छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती.
वैयक्तिक मधपाळ प्रशिक्षण घेणेसाठी पात्रता
अर्जदार साक्षर असावा., स्व:ताची शेती असल्यास प्राधान्य, वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे., मंडळाने निश्चीत केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.
केंद्र चालक प्रगतिशिल मधपाळ/संस्था व्यक्ति प्रशिक्षण घेणेसाठी पात्रता
अर्जदार किमान 10 वी पास असावा., वय वर्ष २१ पेक्षा जास्त असावे., अर्जदार व्यक्तिच्या नांवे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नांवे किमान एक एकर शेती जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन असणे आवश्यक आहे., लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता व सुविधा असावी.
केंद्र चालक संस्था प्रशिक्षण घेणेसाठी पात्रता
संस्था नेंदणीकृत असावी., संस्थेच्या नावे मालकीची किंवा 10 वर्षासाठी भाडे तत्वावर 1 एकर घेतलेली शेतजमीन., प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान १००० चौ. फुट क्षेत्राची सुयोग्य इमारत असावी., संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत.
योजनेच्या अटी व शर्ती
लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणांपुर्वी मध व्यवसाय सुरू करणेसंबंधी मंडळास बंधनपत्र लिहून देणे अनिवार्य राहील., मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य, तेव्हा जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार व होतकरु शेतक-यांनी या संधीचा लाभ घ्यावे.
संपर्क
अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, जमानागिरी रोड, धुळे दुरध्वनी- ०२५६२/२४६२९२ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन सुधिर केंजळे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, धुळे यांनी केले आहे.