शेतात विदेशी फळे, फुले पिकवा आणि चार लाखांपर्यंत अनुदान मिळवा
शासनाच्या या योजनेचा लाभ घेऊन शेतामध्ये विदेशी फळे, फुले आणि मसाले यांचे पीक घेतल्यास लाखो रुपये अनुदान मिळू शकते. ड्रॅगन फ्रुट आणि स्ट्रॉबेरीच्या लागवडीला सर्वाधिक अनुदान आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन या बाबींचा समावेश आहे.
राज्यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे यादृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
यासाठी घटक, खर्च मर्यादा व अनुदान मर्यादा, अनुदान पुढीलप्रमाणे
फुले लागवड
कट फ़्लॉवर्स- अल्प भुधारक शेतकरी- 1 लाख रुपये प्रति हेक्टर, एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु. 40 हजार प्रति हेक्टर, इतर शेतकरी- 1 लाख रुपये प्रति हेक्टर, एकुण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल रु. 25 हजार रुपये प्रति हेक्टर,
कंदवर्गीय फुले- अल्पभुधारक शेतकरी- 1 लाख 50 हजार प्रति हेक्टर, एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 60 हजार रुपये प्रति हेक्टर, इतर शेतकरी- 1 लाख 50 हजार प्रति हेक्टर, एकुण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल रु.37 हजार 500 प्रति हेक्टर,
सुटी फुले- अल्पभुधारक शेतकरी- 40 हजार रुपये प्रति हेक्टर, एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 16 हजार रुपये प्रति हेक्टर, इतर शेतकरी- 40 हजार रुपये प्रति हेक्टर, एकुण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 10 हजार रुपये प्रति हेक्टर.
मसाला पिक लागवड
बिया वर्गीय व कंद वर्गिय मसाला पिके- 30 हजार रुपये प्रति हेक्टर, एकुण खर्चाच्या 40 टक्के रक्कम 12 हजार रुपये प्रति हेक्टर,
बहुवर्षिय मसाला पिके- 50 हजार रुपये प्रति हेक्टर, एकुण खर्चाच्या 40 टक्के रक्कम 20 हजार रुपये प्रति हेक्टर.
विदेश फळपिक लागवड
ड्रॅगनफ्रुट- 4 लाख रुपये प्रति हेक्टर, एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लाख 60 हजार रुपये प्रति हेक्टर,
स्ट्रॉबेरी- 2लाख 80 हजार प्रति हेक्टर, एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लाख 12 हजार रुपये प्रति हेक्टर,
अवॅकॅडो- 1 लाख रुपये प्रति हेक्टर, एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रुपये प्रति हेक्टर,
जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन- जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन- 40 हजार रुपये प्रति हेक्टर, खर्चाच्या 50 टक्के व जास्तीत जास्त 20 हजार रुपये प्रति हेक्टर असे आहेत.
तरी विदेशी फळे, फुले, मसाला लागवड करण्यास इच्छुक व जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.
संपर्क
या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबधित नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन के. पी. मोते, संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पूणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.