Bollywood News ‘गॉडफादर’ असणे गरजेचे आहे
Mumbai मुंबई : बाॅलिवुडमध्ये सुपरस्टार होण्यासाठी केवळ सुंदर असुन आणि अभिनयाची गुणवत्ता असुन चालत नाही तर आपण कोणाच्या ग्रुपमध्ये आहोत आणि आपल्याला एखादा गाॅडफादर असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चांगले चित्रपट देऊनही स्ट्रगल करणाऱ्या या अभिनेत्रींचे अनुभव खुप काही सांगुन जातात.
श्रद्धा कपूरनेही ‘आशिकी २’, ‘हसीना’, ‘हाफ गर्लफ्रेंड’ ते अलीकडच्या ‘तू झूठी मैं मक्कार’पर्यंत अनेक हिट चित्रपट दिले. मात्र, मोठ्या निर्मितीसंस्थेच्या कलाकृतीत ती आजवर झळकलेली नाही. अभिनय, सौंदर्य आणि नृत्य या सगळ्यांचा मिलाफ असूनही ती बॉलिवूडमधल्या ग्रुपिझममुळे मागे पडल्याचे तिने मध्यंतरी सांगायचा प्रयत्न केला. हीच गोष्ट दिशा पटनीची. उत्तम अॅथलिट व्यक्तीमत्त्व आणि सौंदर्य असूनही दिशाच्या वाट्याला फारसे चित्रपट आले नाहीत. ‘एम. एस. धोनी ः द अनटोल्ड स्टोरी’, ‘एक व्हिलन रिटर्न्स’, ‘बागी २’, ‘मलंग’, ‘राधे’ ते अलीकडचा ‘योद्धा’ असा तिचा प्रवास आहे. चित्रपटांच्या नायिका ऑडिशनपूर्वीच ठरलेल्या असतात, असे वक्तव्य तिने मध्यंतरी केले होते. चांगली निर्मितीसंस्था मिळूनही इथे टिकण्याचा मार्ग सोपा नाही, हेच या अभिनेत्रींच्या बोलण्यावरून दिसून येत आहे.
‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून तारा सुतारियाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले. याच चित्रपटातून अनन्या पांडेही बॉलिवूडमध्ये दाखल झाली. निर्मिती करण जोहरच्या संस्थेची असल्याने करण आणि या चित्रपटावरही नेपोटिझमला पाठिंबा दिल्याची टीका झाली. मात्र, पुढच्या दोन-चार वर्षांतही तारा आणि अनन्याच्या वाट्याला इतर मोठ्या संस्थांचे बिग बजेट चित्रपट आले नाहीत. तारालाही चांगल्या भूमिका मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे. या दोघींच्या अभिनयक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असले, तरी सिद्ध करण्याची संधीच मिळाली नाही, तर चांगले-वाईट आधीच कसे ठरवणार, असे या दोघींचे म्हणणे आहे.
आलिया भटकडे अशी कोणती गोष्ट आहे जी तुझ्याकडे नाही,’ असा प्रश्न गप्पांच्या कार्यक्रमात निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने अभिनेत्री श्रद्धा कपूरला विचारला आणि त्यावर श्रद्धाने ‘तू नाहीस,’ असे उत्तर दिले. तिच्या या उत्तराने बॉलिवूडमधले ग्रुपिझम आणि गुणवत्तेपेक्षाही तुमच्यासाठी कुणी एक ‘गॉडफादर’ असणे किती गरजेचे आहे, हे दाखवून दिले. श्रद्धाच्या करिअरला आठ-दहा वर्षांचा कालावधी उलटला असला, तरी गेल्या दोन-चार वर्षांत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रींनीही बॉलिवूडमधल्या राजकारणावर भाष्य केल्याने त्याचीच सध्या चर्चा आहे.