दहा दिवसाआड पाणी, तेही दूषित, शिवसेनेचे आंदोलन
Dhule News धुळे : ऐन उन्हाळ्यात शहरात दहा दिवस उशिराने पाणीपुरवठा होत आहे. एवढेच नव्हे तर पिण्याचे पाणी अतीशय दूषित आहे. पाण्याविना धुळेकरांचे हाल होत आहेत. महापालिकेतील बेजबाबदार सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी शिवसेनेने शुक्रवारी दूषित पाणी पालिकेत आणून तीव्र निदर्शने केली.
दूषित पाणीपुरवठ्याच्या बाबतीत कितीही ओरड होत असली तरी महापालिका प्रशासन ढिम्म आहे. यामुळे ‘नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे थांबवा, भाजपा हटवा, धुळेकरांनो स्वतःला वाचवा’, अशा घोषणा देत शिवसेनेने (उबाठा) महापालिकेसमोर आंदोलन केले. महानगरपालिकेच्या मुख्य दरवाजासमोर टेबलवर शहरातील विविध भागातील दूषित पाण्याच्या बाटल्या गोळा करून ठेवण्यात आल्या आणि ढिम्म मनपा प्रशासनाचे या विषयाकडे लक्ष वेधून घेतले.
याप्रसंगी सत्ताधारी भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘धुळेकरांनो भाजपा हटवा, स्वतःला वाचवा’, अशा आशयाचे पोस्टर यावेळी आंदोलकांकडून झळकविण्यात आले. तसेच शिवसेनेने मनपा आयुक्तांची भेट घेऊन दूषित पाण्याच्या बाटल्या त्यांना भेट दिल्या.
या प्रसंगी शिवसेनेचे नंदुरबार संपर्क प्रमुख माजी आमदार प्रा. शरद पाटील, सह संपर्कप्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे , महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन यांच्यासह नरेंद्र परदेशी, हेमा हेमाडे, डॉ. जयश्री वानखेडे, देवा लोणारी, ललित माळी, भरत मोरे, गुलाब माळी, सुनील पाटील, संदीप सूर्यवंशी, विनोद जगताप, नंदलाल फुलपगारे, लखन चांगरे, संजय जवराज, प्रवीण साळवे, महादू गवळी, छोटू माळी, आनंद जावडेकर, सुभाष मराठे, कैलास मराठे, प्रकाश शिंदे, सुनील चौधरी, पंकज भारस्कर, शरद गोसावी, संदीप चौधरी, नाना शिंदे, मुन्ना पठाण, रामदास जगताप, वैभव पाटील, योगेश पाटील, दिनेश पाटील, गुलाब धोबी, सागर साळवे, पिनू सूर्यवंशी, सागर निकम, शत्रुघ्न तावडे, प्रतिभा सोनवणे, सीमा मराठे, कपिल लिंगायत, संतोष शर्मा, सागर भडागे, राहुल धात्रक, सागर सैदाणे, निलेश कांजरेकर, नाना पारधी, तेजस सपकाळ, मुकेश पवार आदी उपस्थित होते.