OBC students will get their education loan interest back
ओबीसी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्जाचे व्याज मिळणार परत
Dhule धुळे : ओबीसी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्जाचे व्याज परत मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील इतर मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य व देशांतर्गत 10 लाख रुपये व परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लाख रुपये शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेचा धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, धुळे यांनी केले आहे.
ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. अर्जदाराने ऑनलाईन पध्दतीने www.msobcfdc.org या संकेतस्थळ/वेबसाईटवर अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंचन भवन मागे, साक्री रोड, धुळे दुरध्वनी क्र. 02562-278497 येथे संपर्क साधावा. असेही जिल्हा व्यवस्थापकांनी कळविले आहे.
हेही वाचा