Anniversary Celebration of Sankalp Adi Yuva Organization
संकल्प आदियुवा संघटनेचा वर्धापन दिन सोहळा
Nashik नाशिक : संकल्प आदिवासी युवा जागृती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने १८ वा संकल्प वर्धापन दिन सोहळा नाशिक येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई भोये होत्या.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माजी जि. प. सदस्य सुधाकर राऊत, माजी सभापती सुवर्णाताई गांगोडे, राकेश दळवी , ऍड. दत्तूजी पाडवी , किसन ठाकरे, नामदेव बागुल व घनश्याम महाले यांनी मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सञामध्ये संकल्प अभिमान पुरस्कार वितरण सोहळाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी समाज हितासाठी केलेले कार्याबद्दल त्या पदाधिकारी व सदस्यांचा गौरव संकल्प आदिवासी युवा संघटना यांच्यावतीने करण्यात आला. यावेळी शाल, गुलाबपुष्प, ट्राँफी , प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. अशा सन्मानाचे मानकरी जिव्हाळा ग्रुप हरसूल, कणसरा मित्र मंडळ बोरगड, जलपरिषद मित्र परिवार, आदिवासी बचाव अभियान या सामाजिक व संकल्प सहयोगी संघटनेचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा भारतीताई भोये यानी संकल्प आदियुवा संघटनेची संपूर्ण टीम सदस्य यांनी समाजहितासाठी उभे केलेलं मोठं सामाजिक कार्य यांचे कौतुक केले व पुरस्कार दिलेल्या सामाजिक संस्था, व्यक्ती यांना शुभेच्छा दिल्या.
या वर्धापन दिन सोहळ्याचे उद्दघाटन संकल्पच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते करुन कार्यक्रमाची सुरवात आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली. संकल्प आदियुवा जागृती संघटनाचे अध्यक्ष चेतन खंबाईत यांनी आलेल्या पाहुन्याचे स्वागत, परिचय व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन परशराम पाडवी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता संकल्पचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष दुर्गेश बोरसे यांनी ” संकल्प आदियुवा जिंदाबाद ” हे थीम साँग सादर केले व संकल्पचे कार्याध्यक्ष डाँ. राजेंद्र बोरसे यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले .
संकल्प संघटनेच्या १८ व्या वर्धापन दिनी उपस्थित प्रमुख मान्यवर व संघटना पदाधिकारी रावण चौरे, प्रा. अशोक बागुल, तुषार सुर्यवंशी, के. के. गांगुर्डे, गितेश्वर खोटरे, योगेश गावित, दुर्वादास गायकवाड, रतन धुम, देविदास कामडी, अनिल वसावे, मनोहर खांडवी तसेच संकल्पचे साक्री तालुका पदाधिकारी विनित सुर्यवंशी, विजय अहिरे, सुरगाणा टीमचे धर्मराज महाले, गणेश वाघमारे, रमेश चौधरी, पेठ टीमचे गौरव चौधरी, मधुकर पाडवी, कळवण तालुक्यातील पदाधिकारी प्रकाश ठाकरे, सुदाम भोये, पुंजाराम खांडवी, अँड. निलेश ठाकरे व हरसुल टीमचे अनिल बोरसे, ज्ञानेश्वर गावित आदी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन संकल्प टीमचे पदाधिकारी किरण खंबाईत, प्रदिप इंपाळ, रुपेश गावित, कांतीलाल नाठे, शिरीष चौधरी, राकेश गांगुर्डे, विजय घुटे, सुनिल गांगुर्डे, मनोहर गांगोडे, मनूभाऊ खंबाईत यांनी यशस्वीरित्या पार पाडले.