Orthopedic specialist Dr. Spontaneous response to bone screening camp conducted by Parag Sancheti
अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पराग संचेती यांनी घेतलेल्या हाडांच्या तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Dhule News धुळे : शहरातील साक्री रोडवरील डॉ. के. ए .सैदाणे यांच्या सुयोग अक्सीडेंट हॉस्पिटल येथे भारतीय जैन संघटना आणि संचेती इन्स्टिट्यूट फॉर आर्थोपेडिक्स आणि रिहेबिलीटेशन यांच्यातर्फे हाडांच्या आजारांच्या रुग्णांचे भव्य मोफत तपासणी शिबिर घेण्यात आले.
या शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरासह जिल्ह्यातील एकूण तीनशे रुग्णांनी हाडांच्या मोफत तपासणी शिबिरात नोंदणी केली. प्रत्यक्षात चारशे दहा रुग्णांनी हाडांची तपासणी करून घेतली.
संचेती इन्स्टिट्यूट फॉर आर्थोपेडिक्स आणि रीहेबिलिटेशनचे चेअरमन डॉ. पराग संचेती, डॉ. सिद्धार्थ अय्यर या तज्ञ डॉक्टरांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी या मोफत तपासणी शिबिरात सांधेदुखी, संधिवात, सांधे प्रत्यारोपण, कंबर दुखणे, हातापायांना मुंग्या येणे, फ्रोझन शोल्डर, मणक्याचे जुने आजार, डायबेटिक नुरापेथि, सायटिका पेन, लिगामेंट इंजुरी, टेनिस एलबो, हीप व नी रिप्लेसमेंट नंतरचे उपचार याबाबत मार्गदर्शन व तपासणी केली.
तपासणीसाठी आलेल्या एकूण सात रुग्णांना तात्काळ ऑपरेशन करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. संचेतींच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तसा सल्ला दिला. शिबिराच्या माध्यमातून आलेल्या रुग्णांना ऑपरेशन दरात वीस टक्के सूट दिली जाईल, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. तपासणीसाठी आलेल्या काही रुग्णांना फिजिओथेरपीचे उपचार मोफत करण्यात आले.