Various competitions organized by Nehru Yuva Kendra
नेहरू युवा केंद्रातर्फे विविध स्पर्धा उत्साहात
Dhule News धुळे : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीड़ा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र धुळे आणि सारा फाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील जो. रा. सिटी महाविद्यालयात युवकांच्या सहभागातून पार पडला.
सदर कार्यक्रमात सांस्कृतिक नृत्य, भाषण, कविता लेखन, फोटोग्राफी व चित्रकला या पाच प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. चारही तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या मोठ्या सहभागातून कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाच्या उदघाटन सोहळ्यास एस. डी. आर. एफ. बल गट क्र. ६ धुळे सहाय्यक समादेशक पद्माकर पारखे, पोलीस निरीक्षक रुपदास सोनोने, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड व एस. डी. आर. एफ. टीम क्रमांक तीन उपस्थित होती. संपूर्ण प्रात्यक्षिके उपस्थित युवा वर्गाला दाखविण्यात आले.
तसेच नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी जितेंद्र सोनवणे, नवजीवन विद्या विकास मंडळ अध्यक्ष शशिकांत भदाणे, जिल्हा समन्वयक युनिसेफ श्रीकांत मोरे, जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्या समुपदेशक नीता खलाने, मातोश्री गुंताबाई आखाडे बहुद्देशीय संस्था अध्यक्ष दगडू आखाडे उपस्थित होते.
तसेच सर्व स्पर्धांना परिक्षक म्हणून दत्ता ढाले, सुदाम राठोड, राजेंद्र वाकळे, प्रणव कुंभारे, शेखर शिंदे, किशोर वाकळे, अनिकेत वाकळे, निलेश पाटील यांनी परिक्षक म्हणून कामकाज पाहिले.
बक्षीस वितरण सोहळ्यास अरविंद जाधव, धुळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रवी बेलपाठक, नगाव जिल्हापरिषद सदस्य राम भदाणे, बहुजन रयत परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रविंद्र वाकळे, जो. रा. सिटी महाविद्यालयाचे प्राचार्य पावरा, नेहरू युवा केंद्राचे नाना पाटील आदी.
बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील युवा कलाकारांनी जोरदार कलेचे प्रदर्शन केले. बक्षीस समारंभात विजेत्या स्पर्धकांना १००० ते ५००० रोख रक्कम प्रदान करण्यात आली. ट्रॉफी, प्रमाणपत्र देण्यात आले. विजेते स्पर्धक हे मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात सहभागी होतील. तसेच चेतन पाटोळे यांना युवा मंडळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर क्षितिज साळुंखे यांना देखील कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सर्व नियोजन सारा फाऊंडेशन अध्यक्ष संकेत वाकळे, किरण अडावतकर, अथर्व कुंभारे, दुर्गेश शिंदे, यशराज राठोड, विवेक जाधव यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषभ अहिरे यांनी केले.