एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
Dhule News धुळे : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24 क्षेत्र विस्तार घटकांतर्गत फळे, फुले, मसाला लागवडीसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन कुरबान तडवी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
धुळे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड तसेच आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन या बाबीचा समावेश आहे.
राज्यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला पिके या पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे यादृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
या घटकांसाठी अनुदान पुढील प्रमाणे
घटक, खर्च मर्यादा, अनुदान मर्यादा
फुले लागवड- कट फ्रलावर्स-अल्प भूधारक शेतकरी, रु. 1 लाख प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु. 40 हजार प्रति हेक्टर, इतर शेतकरी, रु. 1 लाख प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल रु. 25 हजार प्रति हेक्टर. कंदवर्गीय फुले- अल्प भूधारक शेतकरी, रु. 1 लाख 50 हजार प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु. 60 हजार प्रति हेक्टर, इतर शेतकरी, रु. 1 लाख 50 हजार प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल रु. 37 हजार 500 प्रति हेक्टर.
सुटी फुले- अल्प भूधारक शेतकरी, रु. 40 हजार प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु. 16 हजार प्रति हेक्टर, इतर शेतकरी, रु. 40 हजार प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल रु. 10 हजार प्रति हेक्टर.
मसाला पिक लागवड- बिया वर्गीय वकंदवर्गीय मसाला पिके, रु. 30 हजार प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु. 12 हजार प्रति हेक्टर, बहुवार्षिक मसाला पिके,, रु. 50 हजार प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु. 20 हजार प्रति हेक्टर.
विदेशी फळपिक लागवड- ड्रगन फ्रुट, रु. 4 लाख प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु. 1 लाख 60 हजार प्रति हेक्टर, स्ट्रॉबेरी, रु. 2 लाख 80 हजार प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु. 1 लाख 12 हजार प्रति हेक्टर, अवॅकॅडो, रु. 1 लाख प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु. 40 हजार प्रति हेक्टर.
जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, रु. 40लाख प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु. 20 हजार प्रति हेक्टर याप्रमाणे आहे.
शेतकऱ्यांनी विदेशी फळे, फुले, मसाला लागवड करण्यास इच्छुक व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनांच्या माहितीसाठी संबंधीत नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. तडवी यांनी केले आहे.
हेही वाचा