आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
Dhule News धुळे : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे या योजनेंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणेसाठी, या विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता असून देखील आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहु नये, परदेशातील शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून परदेशातील विद्यापीठामध्ये शासन निर्णय 31 मार्च 2005 मध्ये नमुद विविध अभ्यासक्रमासाठी ज्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, अशा एकूण 10 विद्यार्थ्याचा परदेशातील शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी अनुदान म्हणून शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.
धुळे प्रकल्पांतर्गत येणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी (मुला-मुलींना) परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे योजनेंतर्गत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरीता शिष्यवृत्तीचे अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे ता. जि. धुळे येथे जमा करावेत. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे जि.धुळे, बडगुजर प्लॉट नं.24, राम सर्जिकल हॉस्पीटल शेजारी, 80 फुटी रोड, धुळे दुरध्वनी क्र. (02562-240955) येथे संपर्क साधावा. असे तृप्ती धोडमिसे, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.