How Much Debt Does India Have
भारतावर किती कर्ज ?
Dhule News धुळे : भारतावर कर्जाचा मोठा डोंगर आहे. मनोज तिवारी या पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार तसेच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार भारतावर १०२ लक्ष हजार कोटी इतके कर्ज आहे, अशी माहिती महाराष्ट्र विकास समितीचे अध्यक्ष ॲड. अण्णाराव पाटील यांनी गुरुवारी धुळ्यात दिली.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, आजपर्यंत या देशात सत्तेवर असलेल्या विविध पक्षातील प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी कर्ज काढत असताना या देशातील पर्वत, नद्या, समुद्र आणि जमीन सुध्दा गहाण ठेवली आहे. एवढेच नव्हे तर सिक्युरिटी म्हणून देशातील १३५ कोटी लोकांना जामीनास पात्र केले आहे. म्हणजे हे कर्ज देशातील सामान्य जनतेच्या डोक्यावर आहे. जर या कर्जाची परतफेड केली नाही तर या देशाची अवस्था पाकिस्तानपेक्षाही वाईट होणार आहे. कारण सत्ताधारी केवळ कर्ज काढत राहिले, परतफेड मात्र कधीच केली नाही. या परिस्थितीवर मात करायची असेल तर महाराष्ट्र विकास समिती सक्षम पर्याय आहे. आम्ही कर्जाची परतफेड करायला सुरुवात करू. महत्त्वाचे म्हणजे देशात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता सत्ताधाऱ्यांनी टिकू दिली नाही. ती असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि तशा प्रकारचे निरपेक्ष लोकशाही असलेले सरकार आम्ही देणार आहोत, असा विश्वास ॲड. अण्णाराव पाटील यांनी व्यक्त केला.
विविध २० पक्ष-संघटना मिळून गठीत झालेली ही समिती आगामी निवडणुकांमध्ये मतदारांसमोर सक्षम पर्याय देणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे २६ तारखेला या समितीचा महामेळावा होत आहे.
हेही वाचा