How much does Aadhaar card cost as per the new tariff?
नवीन दरपत्रकानुसार आधार कार्डसाठी किती पैसे लागतात?
Dhule News धुळे : शासन नियमाप्रमाणे निश्चीत केलेल्या दराबाबत तसेच नागरीकांना शासकीय दरानुसार प्रमाणपत्र तसेच इतर सर्व शासकीय सेवा मिळणेकामी आपले सरकार सेवा केंद्रांवर दर्शनी भागावर नागरीकांना दिसेल अशा ठिकाणी दरफलक लावण्यात येवुन सदर दरफलकानुसार दर आकारण्यात यावेत.
तसेच शासकीय सेवांची यादी व सेवा देणेचा कालावधी बाबतचा फलक देखील केंद्रावर लावण्यात यावा. शासनाव्दारे निश्चित करण्यात आलेल्या दरापेक्षा जास्त दराची आकारणी करणाऱ्या तसेच शासन नियमांचे पालन न करणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्र चालकाविरुध्द शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येईल तसेच त्यांचे आपले सरकार सेवा केंद्र देखील रद्द करण्यात येईल.
प्रतिज्ञापत्रासह जातीचे प्रमाणपत्राचा दर हा रु.57.20 असुन उर्वरित सर्व शासकीय सेवांचा (प्रमाणपत्र) दर रु.33.60 असल्याने यापेक्षा जास्तची आकारणी करणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्र चालकाविरुध्द तक्रार संबंधीत तहसिलदार यांचेकडे दाखल करावी.
आधार नोंदणी व अपडेशनचे नवीन दरपत्रक जाहीर
आधार नोंदणीकामी UIDAI यांचेकडील Office Memorandum 20 एप्रिल, 2023 व्दारे UIDAI मार्फत जाहिर केलेले दर पुढील प्रमाणे :
नवीन आधार नोंदणी करणे: निशुल्क,
5 ते 7 व 15 ते 17 वयोगटातील बालक यांचे आधार बायोमेट्रिक अद्ययावत करणे: (अनिवार्य) उदा. हाताचे ठसे, डोळ्याचे बुबुळ यांचे बायोमेट्रिक अपडेशन करणे – निशुल्क,
7 ते 15 वयोगटातील बालक व 17 वर्षावरील नागरीकांचे आधार बायोमेट्रिक अद्ययावत करणे. (अनिवार्य) उदा. हाताचे ठसे, डोळ्याचे बुबुळ यांचे बायोमेट्रिक अपडेशन करणे- 100/- रुपये.
इतर बायोमेट्रिक अपडेशन करणे (डेमोग्राफिकसह किंवा डेमोग्राफिक विना)- शुल्क 100/- रुपये.
डेमोग्राफिक अपडेशन करणे (अपडेशन करतांना एक किंवा जास्त बदल करणे). ऑनलाईन पोर्टलव्दारे किंवा ECMP/ UPL/ CELC या आधार नोंदणी केंद्राचा उपयोग करुन- शुल्क 50/- रुपये.
आधार केंद्राव्दारे POI (ओळखीचा पुरावा/Proof of Identity) व POA (पत्त्याचा पुरावा/Proof of Address) संबंधी कागदपत्र (डॉक्युमेंट) अपडेट करणे- शुल्क 50/- रुपये.
myaadhar या ऑनलाईन पोर्टलव्दारे स्वत: ऑनलाईन POA/POI डॉक्युमेंट अपडेट करणे- शुल्क 25/- रुपये.
eKYC वापरुन आधार शोधणे, आधार शोधणे, आधार संबंधी इतर कोणतेही साधन, ई आधार कार्डची कलर प्रिंटर देणे ( A4 कागदावर )- शुल्क 30/- रुपये.
Home Enrolment Service
UIDAI यांचेकडील Office Memorandum 5 एप्रिल 2023 नुसार नागरीकांच्या एकच पत्त्यावर आधार नोंदणी सेवा देणे: (Home Enrolment Service) संबंधी प्रथम नोंदणी 700/- व इतर सर्व नोंदणी 350/- याप्रमाणे शुल्क, प्रथम नोंदणी – 700/- रुपये व इतर सर्व नोंदणी 350/- रुपये,
PIN आधारित पत्ता प्रमाणीकरण पत्र (Aadhar Address Validation Letter)- शुल्क 50/- रुपये असे दर आहेत.
वरिल शुल्क व्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क आकारणी केली किंवा उपरोक्त दरापेक्षा आधार केंद्र चालक जास्तची आकारणी करत असल्यास अशा केंद्र चालकाविरुध्द तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे व संबंधीत तहसिलदार किंवा 1947 या टोल फ्रि क्रमांकावर तक्रार करावी.
भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण नवी दिल्ली यांचेकडील अधिसुचना (राजपत्र) 9 नोव्हेंबर 2022 मध्ये नमुद केलेल्या सुधारित नियमावलीनुसार आधार कार्ड नोंदवुन 10 वर्ष पुर्ण झालेल्या आधार कार्डधारकांनी त्यांचे आधार कार्डाशी POI (ओळखीचा पुरावा/Proof of Identity) व POA (पत्त्याचा पुरावा/Proof of Address) दस्तऐवज अद्ययावत (डॉक्युमेंट अपडेट) करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या नागरीकांचे आधार नोंदणीस 10 वर्षाचा कालावधी पुर्ण झालेला आहे, तसेच ज्या नागरीकांना आधार कार्ड काढतांना आपले POI (ओळखीचा पुरावा/Proof of Identity) व POA (पत्त्याचा पुरावा/Proof of Address) संबंधी कागदपत्र (डॉक्युमेट) ऑनलाईन सादर केले नाहीत, अशा नागरीकांनी आधार अद्ययावत करणेकामी आधार कार्डाशी आपले ओळखीचा पुरावा (POI) व पत्त्याचा पुरावा (POA) संबंधी कागदपत्र (डॉक्युमेट) जवळच्या आधार केंद्रावर प्रत्यक्ष जावुन अद्ययावत करावे. असे आवाहन अध्यक्ष, जिल्हा सेतू समिती तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.