farmers march to Shingade
Shivsena शेतकऱ्यांचा शिंगाडे मोर्चा
Dhule News शिंदखेडा : तापी नदीवरील उपसा सिंचन योजना तात्काळ सुरु करा. शेतकऱ्यांना 18 तास अखंडीत विज पुरवठा करा. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना (उबाठा) तर्फे सोमवारी दुपारी 12.30 वाजता शिंदखेडा तहसील कार्यालयावर ‘शेतकरी जनआक्रोश शिंगाडे मोर्चा’ काढण्यात आला.
शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी हातात शिंगाडे उंचावून घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला. शिवसेनेचे धुळे जिल्हा संपर्कप्रमुख अशोक धात्रक, सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी 12.00 वाजता गांधी चौक येथुन मोर्चाला सुरुवात झाली.
यावेळी ढोलताशांच्या गजरात, भगवे झेंडे हातात घेत, जय भवानी, जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद, घोषणाबाजी करण्यात आली. पारधीवाडा, भगवा चौफुली मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात मोठ्या संख्येने गर्दी असल्याने पोलीसांनी प्रवेशद्वारावरच मोर्चेकऱ्यांना अडवले. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला तहसील समवेत चर्चा करण्यासाठी आत सोडण्यात आले. तहसीलदारांशी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करुन मागणीचे निवेदन देण्यात आले. मागण्या सोडवल्या न गेल्यास आंदोलन तीव्र करत वेळप्रसंगी कायदा हातात घेण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासनासह तहसीलदार, वीजपुरवठा अधिकारी, कृषि अधिकारी, मंडळ अधिकारी हजर होते.
प्रमुख मागण्या अशा
पिक विम्याचे पैसे तात्काळ द्या. अतिवृष्टी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई तात्काळ द्या. शेतकऱ्यांना पीककर्ज तात्काळ उपलब्ध करुन द्या. वाडी-शेवाडे धरणाच्या पाटचाऱ्यांची कामे तात्काळ करुन शेतकऱ्यांना मोबदला द्या व भाडेपट्टा लागु करा. सिंचन विहीरी तात्काळ मंजुर करा. सिंदखेडा येथे 132 के.व्ही. विद्युत केंद्र मंजुर करा. वादळामुळे नुकसान झालेल्या शेतातील विद्युत खांब पुन्हा कार्यरत करा. शिंदखेडा व दोंडाईचा शहरातील शेतकऱ्यांना सिंचन विहीरींचा लाभ द्या. पीएम किसान योजना किंवा शासकीय अनुदानास बँकांनी होल्ड लावु नये. धुळे जिल्ह्याचा पोकरा योजनेत समावेश करा. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान तात्काळ द्या. कापसाला प्रति क्विंटल 12 हजार रुपये भाव द्या. कांदा, मका, गहू, ज्वारी, बाजरी हमीभाव केंद्रे सुरु करा. जुने कोडदे, लंघाणे, लोहगांव, वसमाने, नवे कोडदे येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील अवैध वाळु उत्खनन प्रकरणी दाखल बोजे कमी करा. नरडाणा एमआयडीसी टप्पा क्र. 3 मधील जमिनीचे शिक्के काढावेत अथवा मोबदला द्यावा. वाघाडी परिसरातील उद्योगांनी दुषीत पाणी सोडल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्याची चौकशी करुन नुकसान भरपाई द्या. शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहनपर अनुदान तात्काळ द्या. जामफळ धरणाच्या पोटचाऱ्या खलाणे, चांदगड, निशाणे, वायपुर पर्यंत कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या होत्या.
यावेळी शिवसेना (उबाठा) चे संपर्कप्रमुख अशोक धात्रक, सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, भरत राजपुत, जिल्हा संघटक मंगेश पवार, जिल्हा समन्वयक डॉ. भरत राजपुत, युवासेना जिल्हायुवाधिकारी आकाश कोळी, उपजिल्हा संघटक कल्याण बागल, भाईदास पाटील, विधानसभा संघटक गणेश परदेशी, तालुकाप्रमुख गिरीश देसले, ईश्वर पाटील, माजी जि.प.सदस्य छोटु पाटील, माजी उपजिल्हाप्रमुख सर्जेराव पाटील, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, तालुका संघटक डॉ.मनोज पाटील, शानाभाऊ धनगर, शहरप्रमुख संतोष देसले, तालुका समन्वयक विनायक पवार, हिरालाल बोरसे, शैलेश सोनार, राजेश रुपचंदाणी, बळसाणे पं.स.सदस्य महावीर जैन, माजी शहरप्रमुख नंदकिशोर पाटील, सागर देसले, प्रदीप पवार, चंद्रसिंग ठाकुर, आर.आर.पाटील, दिपक जगताप, मनोज पवार, धनसिंग वसावे, नितीन माळी, राजेंद्र पवार, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र माळी, संतोष माळी, रावसाहेब सैंदाणे, मनोहर राजपुत, रमेश बोरसे, किशोर पाटील, अशोक मराठे, प्रताप ठाकूर, गणेश पाटील, कल्याण पाटील, पंडीतराव पवार, दिपक बोरसे, भुषण सोनवणे, नेवाडेचे माजी सरपंच लक्ष्मीकांत साळुंके, भुषण पाटील, किरण पाटील, हिरालाल साळुंके, खंडा आप्पा वाघ, अवदास साळुंके, राजेंद्र साळुंके, सुरेश सिसोदे, रुपेश खंडारे, कैलास पाटील, संभाजी पाटील, मच्छिंद्र पाटील, हिरालाल पाटील, वासुदेव शिंदे, पांडूरंग माळी, भाऊसाहेब कोळी, योगेश वाघ, नरेंद्र पाटील, ज्ञानेश्वर कोळी, बबलू पवार, हितेंद्र निकम, विजय पाटील, हिरालाल थोरात, नाना पहाडी, संजय साळुंके, नरेंद्र साळुंके, भटु साळुंके, विजय साळुंके, कांतीलाल साळुंके, दिनेश साळुंके आदी उपस्थित होते.