Why accidents happen on Samruddhi highway, three main reasons have come to light
समृध्दी महामार्गावर का होताहेत अपघात, प्रमुख तीन कारणे आली समोर
Mumbai मुंबई : समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, अवघ्या चार महिन्यांमध्ये तब्बल 358 अपघात झाले आहेत. 39 जणांचा जीव गेला आहे. त्यामुळे बहुचर्चित समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका का सुरू आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात पडला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेसमृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी या दरम्यान प्रवासासाठी लागणार वेळ कमी झाला आहे. मात्र, सतत होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावर प्रवास करणे चिंताजनक बनले आहे.
दरम्यान, या महामार्गावरील अपघाताची अनेक कारणे समोर आली आहेत. त्यात महामार्ग संमोहन, चालकाला डुलकी लागणे, शेकडो किलोमीटरचा प्रवास आणि काँक्रीट महामार्ग असल्याने घर्षण होऊन टायर फुटणे ही प्रमुख चार कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे. महामार्ग पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील अपघातांमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
समृद्धी महामार्गवरील अपघातांना नेमकी कोणती कारणं जबाबदार आहे. समृद्धी महामार्गावर गाडी चालवताना कोणती काळजी घ्यायला हवी. समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, याबाबत नागपुरातील व्हीएनआयटी (VNIT) संस्थेच्या सिव्हिल इंजीनियरिंग विभागाच्या ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगच्या चार विद्यार्थ्यांनी प्राध्यापक विश्रुत लांडगे त्यांच्या मार्गदर्शनात अभ्यास आणि संशोधन केलं आहे.
अपघाताचे मुख्य कारण
‘रोड हिप्नोसिस’चा त्रास : समृद्धी महामार्गावरवरील अपघातासाठी ‘महामार्ग संमोहन’ जबाबदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. कोणत्याच अडथळ्यांशिवाय जेव्हा एखादा महामार्ग सरळ एका रेषेत असतो. त्या महामार्गावर तुमची गाडी सरळ एकमार्गे एकाच वेगात अनेक मिनिटे धावत असते.अशा परिस्थितीमध्ये तुमच्या शरीराची हालचाल स्थिर होते, तुमचा मेंदूदेखील क्रियेच्या प्रक्रियेसाठी सक्रिय नसतो. त्या मानवी स्थितीला ‘महामार्ग संमोहन’ असे म्हणतात. हा प्रकार समृद्धी महामार्गावर चालकांसोबत घडत आहे. समृद्धी महामार्गावर गाडी चालवतांना अनेक चालक हे ‘महामार्ग संमोहनाचे’ बळी ठरले आहे.
या अपघातांना ‘रोड हिप्नोसिस’ म्हणजे महामार्गावरील शेकडो किमीपर्यंत असलेला तोच तोचपणा कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. दूरपर्यंत काही वेगळे दिसतच नसल्याने चालकाचे मनही बधीर होते आणि त्यामुळे हा अपघात घडत असल्याचा अंदाज आहे. यावर अनेक संस्थाकडून अभ्यास सुरू असून, त्यानुसार कार्य़वाही केली जाणार असल्याचे महामार्ग पोलिसांनी म्हटले आहे.
समृद्धी महामार्गावर दिवसाला सरासरी ९अपघात होतात. गेल्या तीन महिन्यात अपघातात ३७ मृत्यू झाले आहेत. गंभीर स्वरुपाचे ११२अपघात झालेत. यात सकाळी ८ ते १० दरम्यान ३४ टक्के अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर Highway Hypnosis महामार्ग संमोहनमुळे म्हणजे एकसारखे ड्रायव्हिंगमुळे ३२ टक्के अपघात झाल्यांचं नोंद झाली आहे. टायर फुटल्यामुळे ३४ टक्के तर लेन चेंज करताना ४० टक्के अपघात झाले आहे. चालकाचं लक्ष विचलित झाल्याने २४ टक्के अपघात झाले असून यात ८ टक्के अपघात हे मोबाईल हाताळताना झाले असल्याची नोंद आहे.
समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून त्यावर अपघातांचे सत्र सुरू आहे. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत या महामार्गावर ३५८ अपघात घडले असून, यामध्ये ३९ जणांनी जीव गमावला आहे. १४३ जण या अपघातांमध्ये गंभीर जखमी झाले असून, २३६ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. १५३ अपघातांमध्ये कुणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
महामार्ग पोलिसांनी या अपघातांमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक १०४ अपघात डुलकी लागल्याने किंवा शेकडो किमीचा सलग प्रवास करून थकल्याने घडले आहेत. ८१ अपघात हे टायर फुटल्याने घडले असून, उष्ण तापमान आणि अतिवेग यामुळे घर्षण होऊन टायरफुटीच्या घटना घडत असल्याचे म्हटले जात आहे. अतिवेगामुळे ७२, प्राणी मध्ये आल्याने १८, तांत्रिक बिघाडामुळे १६, ब्रेक डाऊन झाल्याने १४; तर इतर काही कारणांमुळे ७४ अपघात घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
अपघात टाळण्यासाठी उपाय
ड्रायव्हिंग करताना एकसुरीपणा टाळण्यासाठी ठिकाठिकाणी साईन बोर्ड,स्क्रीन डिस्प्ले लावणे
वाहनांच्या टायरमध्ये नायट्रोजन हवा असणं
गाड्यांमध्ये समोरील एअर बलून बरोबर साइड सेफ्टी आवश्यक
वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना उदा.सीसीटीव्ही,स्पीड कॅमेरा
विश्रांती थांबे आवश्यक : या महामार्गावर अद्याप विश्रांती थांबे, पोलिस चौक्या बांधण्यात आलेल्या नाही. विश्रांती थांबे नसल्याने चालक अनेक तास वाहन चालवतात. पोलिस नसल्याने अपघातानंतर लगेच मदत मिळत नसल्याने हे बळी जात आहेत.