अजित पवारांची बंडखोरी कौटुंबिक वादामुळेच, गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट
Dhule News धुळे : शरद पवारांना मुलीचा मोह अनावर झाला होता. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सुप्रिया सुळे यांना पुढे केले जात होते आणि अजित पवारांसारख्या दिग्गज नेत्याला बाजूला सारण्यात आले होते. या कौटुंबिक वादामुळेच अजित पवारांनी बंडखोरी केली, अशी माहिती धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांना दिली.
शिरपूर तालुक्यातील पळासनेर अपघातातील जखमींची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घेतली भेट, अपघातातील मृतांना पाच लाखाची तर जखमींना दोन लाखाची शासकीय मदतीची केली घोषणा… धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे झालेल्या भीषण अपघातातील जखमींची धुळे जिल्हा रुग्णालयात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन विचारपूस केली. जखमी झालेल्या रुग्णांमध्ये दोन जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्याचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत या अपघातातील मृतांना शासनातर्फे पाच लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना दोन लाख रुपयांची मदत घोषित केली आहे, त्याचप्रमाणे इतर जखमींवर शासकीय खर्चातून उपचार केला जाईल असे देखील या वेळेस मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
यावेळी या संपूर्ण अपघाताची भीषणता लक्षात घेता प्रथमदर्शी कंटेनर चालकाच्या जबाबदारी मुळे हा अपघात झाले असल्याचे त्यांनी सांगितले तसेच या संपूर्ण अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश देखील यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
हेही वाचा