रवी राणा यांनाही धमकीचा फोन, जीवे मारण्याची धमकी
Nagpur News नागपूर : बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.फोनवरून ही धमकी देण्यात आलेली आहे. या प्रकरणी रवी राणा यांचे खासगी सचिव विनोद गृहे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. सतत वादग्रस्त विधानं करुन चर्चेत राहणारे आमदार रवी राणा यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यातमध्ये फिर्याद देण्यात आली.
आमदार रवी राणा यांचे खासगी सचिव विनोद गुहे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीमध्ये आठ-दिवसांपासून मोबाईलवर धमक्या येत असल्याचं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एकही शब्द उच्चारला तर रवी राणा यांना पिस्तुल आणि चाकूने ठार मारु, अशी धमकी दिल्याचं फिर्यादीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. सध्या राणा हे नागपूर येथे अविशेशनासाठी उपस्थित आहेत. त्यापूर्वीच आमरावती येथे असतांना त्यांना या धमक्या आलेल्या आहेत.
अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन अटक करण्याची मागणी आ. रवी राणा यांच्या वतीने करण्यात आलीय. सदरील व्यक्ती उद्धव ठाकरे यांचा समर्थक असल्याचं सांगत असल्याचं गुहे यांनी सांगितलं. खबरदारीचा उपाय म्हणून राणांच्या वतीने पोलिसांत तक्रार देण्यात आलेली आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रवी राणा यांच्या मोबाईलवर एका क्रमांकावरून फोन येत आहेत. यामध्ये उद्धव ठाकरेबद्दल एकही शब्द उच्चारल्यास पिस्तूल आणि चाकूने ठार मारू अशी धमकी सदर आरोपीने राणा यांना दिली. सद्या रवी राणा हे नागपूर येथे अधिवेशनासाठी उपस्थित आहेत. त्यापूर्वीच त्यांना या धमक्या आल्या आहेत. धमकी देणाऱ्या व्यक्तीची सखोल चौकशी करून त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी विनोद गृहे यांनी केली आहे. सदर धमकी देणारी व्यक्ती उद्धव ठाकरे यांचा समर्थक असल्याचं सांगत आहे. उद्धव ठाकरे विरोधात काही बोलल्यास ठार मारण्यात येईल, असे आरोपीने म्हटल्याचे गृहे यांनी सांगितल सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.