धुळ्यात आम आदमी पार्टीची ताकद वाढतेयं
Dhule News धुळे : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात आम आदमी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे नाशिक विभाग प्रभारी रवींद्रसिंग अहुवालिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. त्यामुळे पक्षाची ताकद वाढत असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला. आम आदमी पार्टीतर्फे धुळे शहरात गरुड वाचनालय येथे पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी डॉ. संदीप भगवान पाटील, धनंजय रवींद्र पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. दिल्ली आणि पंजाब राज्यामध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आहे. आगामी काळात महाराष्ट्रमध्येही आम आदमी पक्षाची सत्ता येईल. त्यासाठी आगामी निवडणुकांची तयारी करण्याकरिता पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची बैठक मोठ्या उत्साहात झाली.
यावेळी नाशिक विभाग प्रभारी रवींद्रसिंग अहुवालिया, जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार, महानगर अध्यक्ष आसिफ मंसूरी, उपाध्यक्ष महादू पाटील, प्रसिध्दी प्रमुख सुयोग पाटील, शिंदखेडा तालुका अध्यक्ष भूषण चव्हाण, ज्ञानेश्वर पाटील, अकबर पटेल , रामकृष्ण पाटील, प्रशांत पाटील याच्यखसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.