मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडेच्या निषेधार्थ काॅंग्रेसचे आंदोलन
Dhule News धुळे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल बदनामीकारक आणि आक्षेपार्ह वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले असून, त्यांना बेड्या ठोका अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी धुळ्यात दिला.
राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल धुळे जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने शनिवारी सकाळी श धुळ्यातील गांधी पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. याप्रसंगी बोलताना आमदार कुणाल पाटील यांनी संभाजी भिडे यांचा निषेध केला आणि सरकारवर टीका केली.
आमदार पाटील म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा यांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी केली. देशाला समता आणि बंधुतेचा मार्ग दाखवला. महात्मा गांधींमुळे जगात भारताची ओळख आहे. त्यांच्या विचारांच्या आदर्शांवर संपूर्ण देश चालत आहे आणि त्याच राष्ट्रपित्याचा अवमान करण्याचे दू:साहस संभाजी भिडे यांनी केले आहे. सरकारमधील जातीयवादी आणि मनुवादी विचारांचे लोक संभाजी भिडे यांना संरक्षण देत आहेत. भिडेंच्या वक्तव्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकास वेदना झाल्या आहेत. म्हणून संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शासन झाले पाहिजे; जेणेकरून येणाऱ्या काळात गांधीजींबद्दल अवमानास्पद वक्तव्य करण्याचे धाडस कोणीच करणार नाही. संभाजी भिडे यांना सरकारने अटक केली नाही तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार कुणाल पाटील यांनी दिला.
निषेध आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, रमेश श्रीखंडे, साबीर खान, पितांबर महाले, लहू पाटील, माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे , एन. डी. पाटील, अशोक सुडके, योगेश पाटील, पंढरीनाथ पाटील, गुलाबराव पाटील, प्रमोद सिसोदे, दीपक साळुंखे, प्रा. जसपालसिंह सिसोदिया, प्रकाश पाटील, मुकुंद कोळवले, ॲड. बी. डी. पाटील, सोमनाथ पाटील, बापू खैरनार, भानुदास माळी, उत्तमसिंग राजपूत, संतोष राजपूत, के. डी. पाटील, गणेश गर्दे, हर्षल साळुंखे, नाना शिंदे, गुणवंत वाघ, दिनेश पाटील, मुंकद कोळवले, राजेंद्र खैरनार, किरण नगराळे, शिवाजी आहिरे, सुरेखा बडगुजर, अर्चना पाटील, बानुबाई शिरसाट, छाया पाटील, अलका बिराडे, यामिनी खैरनार, राजेंद्र देवरे, हरिष पाटील, नगरसेवक शब्बीर पिंजारी, इलियास अन्सारी, भटू महाले, संभाजी गवळी, हिंमत बाचकर, आबा पगारे, छोटू चौधरी, उमाकांत पाटील, कन्हैयालाल भदाने, हरिभाऊ चौधरी, भिवसन अहिरे, हरिभाऊ अजळकर, भागवत अहिरे, प्रवीण माळी, सुरेश भील, अशोक शिरसाठ आदी सहभागी झाले होते.