लुंबिनी बुद्ध विहारात विकासकामे सुरू, मोतीनाला पुलाचेही लवकरच रुंदीकरण
Dhule News धुळे : महानगरपालिका क्षेत्रात सोयी-सुविधा विकास योजने अंतर्गत गोदाई कॉलनी साक्री रोड येथील लुबिनी बुद्ध विहार येथे काँक्रीटीकरण करणे व पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. शहराच्या दळणवळणासाठी महत्वाचा असलेल्या मोतीनाला पुलाचे रुंदीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती आमदारांनी यावेळी दिली.
याप्रसंगी लंबिनी बुद्ध विहार समितीच्यावतीने आ. फारुख शाह यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. दीपश्री नाईक, निजाम सैय्यद, प्यारेलाल पिंजारी, आसिफ शाह, डॉ. बापुराव पवार, भैय्यासाहेब पवार, अर्जुन गायकवाड, प्रा. विजय पवार, राजेंद्र बोराळकर, विनय सूर्यवंशी, साहेबराव लोंढे, दिलीप गुलाले, केशव जगदेव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता धर्मेंद्र झाल्टे, विनोद चव्हाण, शरद भामरे, गौतम भामरे, निर्मला पवार, लता मैराळे, नूतन गांगुर्डे, कल्पना बोराळकर, रवींद्र सूर्यवंशी, अरुण मैराळे, फकिरा बागवान, सलमान अन्सारी आदी उपस्थित होते.
धुळे शहरातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनातून प्रत्येक समाज घटकाला न्याय कसा मिळेल या हेतूने आजपर्यंत आमदार फारुख शाह यांनी शहरासाठी काम केले आहे. शहरातील एकविरा देवी मंदिर व जलाराम बाप्पा परिसरातील सुशोभीकरणसाठी निधी उपलब्ध करून दिला. शहरातील व तालुक्यातील अमरधामसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून आणला. बौध्द समाजासाठी लुंबिनी बुद्ध विहार व परिसरातील कामासाठी देखी त्यांनी निधी आणला आहे. तसेच लवकरच अवधान येथे भव्य बुद्ध विहार उभारण्यासाठी आ. फारुख शाह प्रयत्नशील आहेत. धुळे शहराच्या विकासाबरोबर कॉलनी भागातील वॉल कंपाऊंडसाठी सुध्दा आमदारांनी निधी आणला आहे.