मनोहर भिडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
Dhule News धुळे : क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने मनोहर भिडे यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी धुळ्यात मंगळवारी भिडेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत जोरदार निदर्शने केली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनोहर भिडे यांच्याकडून वारंवार महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी मनोहर भिडे यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर त्यांनी आता राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी गरळ ओकली आहे. मनोहर भिडे यांच्याकडून वारंवार महापुरुषांचा अवमान होत असून, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. मनोहर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, दिलीप देवरे, बापू महाजन, अण्णा माळी, अनिल बोरसे, ईश्वर माळी, प्रकाश शिरसाठ, रवींद्र खैरनार, चेतन खैरनार, उमाकांत खलाणे, अमोल अहिरे, कांतीलाल माळी, संदीप सोनवणे, सुशील भदाने, प्राचार्य जाधव, राजकिशोर तायडे, प्राचार्य एस. टी. चौधरी, डॉ. सुनील वाघ, राजेश महाजन, बळीराम भदाणे, मनीष पाटकरी, नवल माळी, भरत माळी, धीरज माळी, रवींद्र माळी, भूषण माळी, सुमित चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
हेही वाचा