व्यायामशाळा विकासासाठी सात लाखांचे अनुदान
Dhule News धुळे : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, आदिवासी घटक योजना व अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत सन 2023-2024 वर्षांसाठी व्यायामशाळा विकास अनुदानासाठी 18 ऑगस्ट,2023 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे मार्फत सन 2023-2024 वर्षांसाठी व्यायामशाळा विकास अनुदानासाठी सर्वसाधारण योजना, आदीवासी घटक योजना व अनुसुचित जाती उपयोजनाअंतर्गत अनुदान मागणीचे प्रस्तावासाठी शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था,ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालीका जिल्हा परिषद, कॅन्टोनमेंट बोर्ड, शासकीय रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व उच्च शिक्षण विभाग यानी मान्यता दिलेल्या शाळा व महाविद्यालये तसेच जिल्हा जिल्हा परिषद, आदिवासी विकास,सामाजिक न्याय विभाग तसेच अल्पसंख्यांक विभाग मार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वसतिगृह, शासकीय ग्रामीण रुग्णालय, शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय जिल्हा रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तसेच शासनाव्दारे मान्यता दिलेल्या शैक्षणीक शाळा व महाविद्यालय यांना शासनामार्फत अनुदान मिळण्यास प्रारंभ होवून 5वर्ष पूर्ण झालेल्या शाळा व महाविद्यालये या अनुदानासाठी पात्र असतील. तसेच क्रीडा विभागाच्या विविध समित्या तसेच पोलीस कल्याण निधी, पोलीस विभाग, शासकीय कार्यालय सुद्धा यासाठी प्रस्ताव सादर करु शकतात.
या योजनेअंतर्गत किमान 500 चौ. फुट चटई क्षेत्राचे स्वतंत्र व्यायामगृह बांधकाम करणे, या बांधकामामध्ये कार्यालय,भांडारगृह, प्रसाधनगृह इत्यादी बाबींचा समावेश असावा. व्यायामशाळा नुतनीकरण व दुरुस्ती करणे. जुन्या नियमानुसार बांधकाम पूर्ण झालेल्या व्यायामशाळा व वर उल्लेखीत क्षेत्रफळाच्या नवीन व्यायामशाळांना अत्याधुनिक व्यायाम साहीत्यांचा पुरवठा करणे. खुली व्यायामशाळा उभारणे ( ओपन जिम ) वरील बाबींपैकी कोणत्याही एका बाबीसाठीच एक वर्षात अनुदान उपलब्धतेनुसार अनुदान मंजूर करण्यात येईल. वर उल्लेखीत बाबीकरीता अंदाजीत खर्चाच्या 100 टक्के किंवा कमाल 7 लक्ष पर्यंतचे अनुदान या पैकी जी रक्कम कमी असेल इतकी रक्कम अनुदान मंजूर करण्यात येईल. अंदाजपत्रक नुसार शासन अनुदान व्यतिरिक्त खर्च येत असल्यास तो संस्थेमार्फत करावा लागेल.
या योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या संस्थांनी यांनी अनुदान मागणीचे प्रस्ताव व अर्जाचा विहीत नमून्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाडीभोकर रोड, देवपूर धुळे येथे दिनांक 27 जुलै,2023 ते 18 ऑगस्ट,2023 पर्यंत या कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन अर्ज प्राप्त करुन घेवून अर्जासोबत जोडलेल्या यादीनुसार आवश्यक त्या कागदपत्राच्या पूर्ततेसह परीपूर्ण प्रस्ताव मुळ एका प्रतीत सादर करावेत. अपूर्ण असलेले व दिलेल्या विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही असे जिल्हा क्रीडा अधिकारी, धुळे यांनी कळविले आहे.
हेही वाचा